Uttar Pradesh Accidnet News Saam tv
देश विदेश

Accident News : मेव्हणीला पळवून नेत होता भावोजी; आडवायला आलेल्या सासरच्यांना कारने चिरडले, मेव्हण्यासह तिघांचा मृत्यू

Uttar Pradesh Accidnet News : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये मेव्हणीला पळवून नेत असताना आरोपीने भरधाव कारने सासू-सासरे आणि मेव्हण्याला चिरडले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • फतेहपूरमध्ये भीषण कार दुर्घटना

  • तिघांचा मृत्यू, चार जखमी

  • पळवून नेण्याच्या प्रयत्नातून घटना

  • पोलिस तपास सुरू, परिसरात तणाव

Uttar Pradesh Fatehpur Accident 3 Dies News उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये मेव्हणीला गाडीतून पळवून नेत असताना भावोजीने सासू-सासऱ्यांना चिरडले असल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मेव्हण्यासह तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात सदर घटना घडली आहे. आरोपीचे नाव दीपक सोनीने असे आहे. त्याचं त्याच्या बायकोच्या चुलत बहिणीचं लग्न त्याच्या नात्यातील एका तरुणाशी करायचे होते. यासाठी पंचायतीसमोर विषय देखील मांडण्यात आला. पंचायतीने त्या दोघांच्या लग्नाला विरोध केला, तसेच हे लग्न मान्य नसल्याचे म्हटले. यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने दिपकने तिला पळवून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्याने त्यासाठी लग्नाची तयारी देखील केली होती. मात्र कुटुंबीयांचा विरोध असल्याने दिपकने तिला पळून घेऊन जाण्याचा मार्ग स्वीकारला.

काही दिवसांपूर्वी आरोपीने त्याच्या मेव्हणीला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. रविवारी आरोपी दिपकने पळून जाण्याचा प्लॅन तयार केला. ठरलेल्या प्लॅननुसार, ते एका चारचाकी कारमधून पळून जात होते. इतक्यात तिथे दिपकचा मेव्हणा आणि सासू सासरे आडवे आले. मात्र भरधाव वेगात असलेल्या कारने तिघांना जागीच चिरडलं.

या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर, एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात घबराट पसरली आणि तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT