UP Accident News Saamtv
देश विदेश

UP Banda Accident: ह्रदयद्रावक! मुलाला साप चावल्याने रुग्णालयात निघाले.. रस्त्यात झाला भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Banda Accident: भरधाव वेगात असलेल्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जावून घुसली.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Accident News: उत्तरप्रदेशमधून एक भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात एक बोलेरो आणि ट्रकमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Uttar Pradesh Accident News)

रुग्णालयात जाताना काळाचा घाला...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बांदा (Banda) जिल्ह्याच्या कामसिन पोलिस स्टेशन हद्दीतील तिलौथा गावात राहणाऱ्या गुज्जीचा १३ वर्षीय मुलगा कल्लू याला रात्री साडेनऊच्या सुमारास विजेचा शॉक लागला. यानंतर कल्लूची आई सरबानो (38) बोलेरोने बाबेरूच्या रुग्णालयात निघाले.

त्यांच्यासोबत परिसरातील कैफ (16) मुलगा चिक्की, बोलेरो चालक हसिम यांच्यासह 8 जण गाडीमध्ये होते. ही गाडी बाबेरू कोतवाली परिसरातील कमसिन रोडवरील परियादाईजवळ आली असता ट्रकला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक आधीच रस्त्यावर उभा होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जावून घुसली.

ट्रकमध्ये घुसली बोलेरो...

ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामध्ये गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली प्रभारी पंकज सिंह यांनी टीमसोबत पोहोचून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

सहा जणांचा मृत्यू...

अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. गाडीमधील इतरांना कटरने बोलेरो कापून बाहेर काढून आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अपघातात मृत झालेल्यांमध्ये साप चावलेला मुलगा कल्लू, त्याची आई शायरा बानो, कैफ, मुजाहिद, शाकीर यांचा समावेश आहे. या भयंकर अपघाताच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT