भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला मोठा फायदा - एलॉन मस्क
भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला मोठा फायदा - एलॉन मस्क Saam Tv
देश विदेश

भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला मोठा फायदा - एलॉन मस्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात भारतीयांच्या (Indians) कौशल्याचं कौतुक केलं जातं. आता आयटी (IT) आणि तंत्रज्ञान (Technology) क्षेत्रातही भारतीय आघाडीवर आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंंग सोशल मीडिया साईट ट्विटरच्या (Twitter) सीईओपदी एका भारतीयाची निवड करण्यात आली आहे. ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल (Parag Agrawal CEO, Twitter) यांना आता थेट सर्वोच्च पदावर म्हणजे मुख्य कार्यकारी पदावर नेमण्यात आलं आहे. हे बातमी प्रसिद्ध होताच पराग अग्रवाल यांना जगभरातून शुभेच्छा येऊ लागल्या. टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (USA benefits greatly from Indian talent! Said Elon Musk)

हे देखील पहा -

अब्जाधीश उद्योजक पॅट्रीक कोलीसन (Patrick Collison) यांनी पगार अग्रवाल यांना शुभेच्छा देत ट्विट केलं की, "गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, आयबीएम, पालो अॅल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ सुद्धा भारतीय आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे हे यश कमालीचं आहे. यामधून अमेरिका विस्थापितांना किती संधी देते हे दिसून येतं." यावर एलॉन मस्क यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली की, "भारतीयांच्या कौशल्याचा अमेरिकेला फार फायदा होतोय." या ट्विटला हजारो लोकांनी लाईक आणि रिट्विट केलं आहे त्यामुळे हे ट्विट चांगलचं व्हायरल झालंय.

जगातल्या अनेक बड्या कंपन्यांमध्ये भारतीयांचा डंका वाजतो. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि आता ट्विटरतचे सीईओ पराग अग्रवाल हे सुद्धा भारतीय आहेत. त्यामुळे जगभरात आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही भारतीय अग्रेसर आहेत हेच सिद्ध होतं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

Bhavesh Bhinde Arrest : दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला केली अटक, मुंबईत दाखल

Prajakta Mali: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

SCROLL FOR NEXT