PM Narendra Modi And Donald Trump  Saam Tv
देश विदेश

टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

US Visa New Rules : अमेरिकतेने व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले आहेत. त्याचा थेट परिणाम भारतीयांवर होणार आहे. भारतामधून अमेरिकेला जाणाऱ्यांची वाट आता आणखी खडतर होणार आहे.

Namdeo Kumbhar

  • अमेरिकेच्या नॉन-इमिग्रंट व्हिसा (NIV) साठी मुलाखत नियम बदलला.

  • भारतातून अमेरिकेला जाणाऱ्यांना परदेशात जाऊन लवकर अपॉइंटमेंट मिळणार नाही.

  • मुंबई व हैदराबादमध्ये मुलाखतीाठी 3.5 महिने लागतात.

  • कोरोना काळात लोक थायलंड, सिंगापूर, जर्मनीसारख्या देशांत जाऊन मुलाखत देत होते; तो मार्ग बंद.

Non-immigrant visa changes : टॅरिफनंतर अमेरिकेने व्हिसाच्या निमयात बदल करत भारताला आणखी एक धक्का दिला आहे. नॉन-इमिग्रेंट व्हिसाच्या नियमात (NIV) बदल केल्याचा थेट परिणाम लाखो भारतीयांवर होणार आहे. व्हिसासाठी अर्ज करणारे भारतीय एनआयव्ही मुलाखत फक्त आपल्याच देशात देणार आहे. विदेशात जाऊन लवकर अपॉइंटमेंटचा विकल्प बंद करण्यात आला आहे.

अमेरिकेने नॉन इमिग्रेंट व्हिसा (NIV) नियमांत बदल केल्याचा परिणाम अनेकांवर होणार आहे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता मुलाखतीसाठी नागरिकता असलेल्या देशाचा पर्याय निवडावा लागणार आहे. या बदलाचा परिणाण अनेकांवर होणार आहे. लवकर व्हिसा मिळवण्यासाठी अनेकजण थायलंड, सिंगापूर अथवा जर्मनीसारख्या देशांत जात होते. अनेक भारतीय विदेशात जाऊन B1 (बिजनेस) अथना B2 (टूरिस्ट) व्हिसा मुलाखत देत होते. अमेरिकेने हा पर्याय सध्या बंद केला आहे.

कोरोना काळात दिलासा -

कोरोना काळात भारतामध्ये व्हिसा मुलाखती लवकर होत नव्हत्या. दोन तीन वर्षांपर्यंत वेळ लागत होता. त्यावेळी भारतामधील अर्जदारांनी विदेशात जाऊन अमेरिकेच्या व्हिसासाठी मुलाखत देत होते. ट्रॅव्हल एजेंट्सनुसार, अनेकजण बँकॉक, सिंगापूर, प्रँकफर्ट, ब्राजील, थायलंड या ठिकाणी अनेकांनी व्हिसाच्या मुलाखती दिल्या. मुलाखत दिल्यानंतर पासपोर्ट मिळताच ते भारतात परत येत होते.

नव्या नियमांचा किती प्रभाव?

टूरिस्ट, बिजनेस, विद्यार्थी, अस्थायी वर्कर्स आणि अमेरिकेत जाऊन लग्न कऱणाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.

व्हिसा मुलाखतीसाठी भारतात किती वेळ लागतो?

अमेरिका विदेश मंत्रालयच्या संकेतस्थळानुसार, भारतामध्ये NIV मुलाखतीसाठी प्रत्येक शहरात वेगवेगळा वेळ लागतोय.

हैदराबाद आणि मुंबई: 3.5 महिने

नवी दिल्ली: 4.5 महीने

कोलकाता: 5 महीने

चेन्नई : 9 महीने

ट्रम्प प्रशासनाचे कठोर नियम

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी व्हिसा नियम अधिक कठोर केले. २ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू कऱण्यात आला आहे. NIV अर्जदारांना, कोणतेही वय असले तरीही काउंसलर मुलाखत द्यावीच लागेल.

कोणाला मिळणार सूट?

B1, B2 व्हिसाची मागील वर्षभरात मुदत संपली आहे, त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तर मुलाखतीत सूट मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पावसामुळे झेंडू फुलांची आवक घटली, दर मात्र वाढले

Trending Blouse Designs For Women: दसऱ्यानिमित्त महिलांनी करा खास पारंपारिक पोशाख, हे आहेत ट्रेंडी ब्लाऊजचे पॅटर्न्स

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

Thursday Horoscope: वाईट काळ संपला ! दसऱ्यापासून ‘या’ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT