Kamala Harris Saam Tv
देश विदेश

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांना कोरोनाची लागण

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना कोरोनाची लागण झाल्यानंतर व्हाईट हाऊसमध्येही चिंता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. कमला हॅरिसचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. ट्विट करून त्यांनी याबाबद माहिती दिली आहे. कॅलीफोर्नियावरून परतल्यावर हॅरीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना कोरोनाची लागण झाल्यानंतर व्हाईट हाऊसमध्येही चिंता वाढली आहे.

ट्विट करत कमला हॅरिस म्हणाल्या की, माझी कोरोना चाचणी झाली, ज्यामध्ये माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत आणि मी CDC मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे. हॅरिस या पुढील काही दिवस घरातून काम पाहणार असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. हॅरीस यांचे दोन्ही डोस जानेवारी महिन्यात पूर्ण झाले. त्यांनी पहिला बूस्टर ऑक्टोबर महिन्यात आणि दुसरा बूस्टर डोस एप्रिल महिन्यात घेतला आहे.

राष्ट्रपती जो बायडन यांना कुठलाच धोका नाही

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार कमला हॅरिस गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती यांच्या संपर्कात नव्हत्या. त्यामुळे काळजी घेण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच हॅरीस ज्यांना भेटल्या त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यासोबतच, उपराष्ट्रपती रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करतील आणि अहवाल निगेटिव्ह आल्यावर व्हाईट हाऊसला परततील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Starter Recipes: पनीरचे ७ आयकॉनिक स्टार्टर, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: उद्यापासून अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT