North Korean leader Kim Jong Un during a military inspection as tensions rise over the US–South Korea Freedom Shield exercise. Saam Tv
देश विदेश

अमेरिकेच्या टार्गेटवर किम जोंग उन, दहा दिवसात होणार तिसरं महायुद्ध?

US South Korea Freedom Shield Military Exercise Details: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा फ्रीडम शील्ड युद्धसराव सुरू झाला आहे. या सरावावर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन कशी प्रतिक्रिया देणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Saam Tv

इराण-इस्रायल युद्धाला आज 10 दिवस होतायेत, तिन्ही देशाचं या युद्धात अतोनात नुकसान होऊनही कोणीही माघार घ्यायला तयार नाही. तर दुसरी कडे ट्रम्प यांनी पुन्हा आपल्या जुन्या शत्रूला पाहून डोळे वटारलेत. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाच्या दिशेनं आपले हजारो सैनिक आणि लष्करी साहित्य पाठवलंय. फ्रिडम शील्डच्या नावाखाली आखातानंतर आता कोरियन द्विपकल्पात युद्ध होणार का हे येत्या 10 दिवसात स्पष्ट होईल.

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास

फ्रिडम शील्डच्या नावाखाली दोन्ही देशांचा एकत्र वार्षिक सैन्य सराव

दक्षिण कोरियाचे 18 हजार सैनिक सहभागी

अमेरिकेच्या हजारो सैनिकांचा सहभाग आणि शस्त्रास्रांचा वापर

19 मार्चपर्यंत सुरु राहणार सैन्य सराव

शत्रुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सैन्याची मजबूत तयारी करणं. सैन्यात समन्वय आणि वेगवान युद्ध क्षमता वाढवत दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिका एकत्रितपणे हा मोठा संयुक्त संरक्षण सराव करत आहे. मात्र या फ्रीडम शील्डला उत्तर कोरियानं कायम आपल्या विरोधी कारवाई म्हणत थेट नव्हे पण कृतीतून प्रतिक्रीया जरुर दिली होती.

पाणबुडीतून दोन क्षेपणास्त्रांचा मारा

बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मॉकड्रिल

2024

किम जोंग उन यांच्या लष्करी तळांना भेटी

नवीन रणगाड्याचे प्रदर्शन

समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

2025

येलो सीमध्ये बँलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

दक्षिण कोरियात सायबर हल्ले आणि GPS जँमिंग

गेल्या ३ वर्षांत किम जोंग उन यांनी युद्धसरावाविरोधात अंगावर आलात तर शिंगावर घेण्याचे इशारे दिले आहेत. कारण उत्तर कोरियानं कायम साम्राज्यवादी अमेरिका आणि दक्षिण कोरियाला नियंत्रणात ठेवलंय. किम जोंगच्या हातात अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत आणि त्यांची गूढ अनपेक्षित कार्यपद्धती पाहिली की ते कोणत्याही थराला जाऊन बलाढ्य अमेरिकेला धडा शिकवू शकतात त्यामुळे पुढच्या १० दिवसात किम जोंग उन आपली प्रतिक्रीया कशी देतात यावर तिसऱ्या महायुद्धाचं भवितव्य आधारित आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT