Donald Trump social media
देश विदेश

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; सुरुवातीच्या निकालांत रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट

US Midterm Election Results : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला धक्का बसल्याचे चित्र आहे. प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी घेतली आहे.

Namdeo Kumbhar

Donald Trump Republican Party election setback : अमेरिकेत पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पार्टी पिछाडीवर आहे. हे सुरूवातीचे कल आहेत. सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन्ही सभागृहात डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत मिळाले नाही, तर हा मोठा धक्का मानला जातोय. (Donald Trump Republican Party election setback)

४३५ जागांच्या प्रतिनिधीगृहाच्या ११५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने ७५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला केवळ ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या महागाईने आधीच त्रस्त असलेल्या अमेरिकन जनतेचा संताप ट्रम्प यांच्यासाठी असह्य ठरू शकतो. दक्षिण कॅरोलिना, फ्लोरिडा, न्यू हॅम्पशायर, व्हर्जिनिया आणि केंटकी येथेही मतदान पूर्ण झाले असून, निकाल लवकरच उपलब्ध होतील.

सिनेटच्या निवडणुकीतही ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ३९ जागांपैकी रिपब्लिकन पक्षाला फक्त १० जागांवर विजय मिळाला आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाने १५ जागा जिंकल्या असून त्यांना बहुमतासाठी आता केवळ ६ जागांची गरज आहे. जॉर्जिया राज्यातुन डेमोक्रॅटिक पक्षाचे सीनेटर जॉन ओसॉफ (Jon Ossoff) यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत सीनेटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. जॉन ओसॉफ यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माइक कॉलिन्स (Mike Collins) यांचा पराभव केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन उमेदवार माइक कॉलिन्स यांचे समर्थन केले होते. अशा स्थितीत ओसॉफ यांचा हा विजय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जॉन ओसॉफ यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि भूमिकेवर उघडपणे टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Fort : डोंगरात कोरलेल्या पायऱ्या, खोल दऱ्या अन् २२५० फूट उंचीचा अद्भुत सुळका; मुंबई-पुण्याजवळ वसलाय खतरनाक ट्रेकिंग स्पॉट

Maharashtra : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! २०२६-२७ मध्ये परीक्षा शुल्क माफ; सरकारकडून नवे नियम जाहीर

Ramayana : 'रामायण'चा तिसरा भागही येणार? रणबीर कपूरच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण | VIDEO

Maharashtra News Live Update : दुष्काळाचा फटका! बाजारात जनावरांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली

भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, ४ घातक वेगवान गोलंदाजांना संधी, कुलदीप-सिराज बेंचवरच, पाहा प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT