Missiles launched during escalating tensions between Iran, the United States, and Israel as the Gulf region braces for a possible major military strike Saam Tv
देश विदेश

आजची रात्र, आखाती युद्धातील काळरात्र ? जगाला हादरा बसणार?

Iran US War: अमेरिका इराणवर विध्वसंक प्रहार करण्याच्या तयारीत आहे... त्यामुळे आखाती युद्धात आजची रात्र काळरात्र कशी ठरणार आहे.... इराणनं अमेरिकेविरोधात काय प्लॅन रचलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

इराण आणि अमेरिका, इस्रायलमधील य़ुद्ध आता निर्णायक वळणावर पोहचलयं...खामेनींच्या मृत्यूनंतर पेटलेला युद्धाचा वणवा विझण्याऐवजी आणखीनच भडकताना दिसतोय... खामेनी आय आर या एक्स हँण्डलवरून अमेरिकेविरोधात पहिली पोस्ट शेअर करण्यात आलीय..हे एक्स अकाउंट आयतुल्ला खामेनीचं आहे.या त एक फोटो आहे.. ज्यात क्षेपणास्त्राच्या निर्मितीपासून ते क्षेपणास्त्राच्या वापरापर्यंतच्या टप्प्याची प्रक्रिया दाखवण्यात आलीय..हा इराणचा अमेरिकेला क्षेपणास्त्र हल्ल्याचा स्पष्ट इशारा असल्याचं म्हटलं जातंय..

झियोनिस्ट राजवटीने मोठी चूक केलीय. याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं ही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तर इराणचे उप परराष्ट्रमंत्र्यांनी ही अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत लढणार, असा निर्धार व्यक्त केलाय. एकीकडे इराणने हा इशारा दिलेला असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी आजची रात्र ही इराणसाठी काळरात्र असेल अशी धमकी दिलीय...

अमेरिकेनं सैन्यानं इराणवरील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय... आज मध्यरात्री इराणवर मोठा हल्ला केला जाऊ शकतो... हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्ब हल्ला असेल... हा हल्ला इराणी क्षेपणास्त्र, लॉन्चर आणि क्षेपणास्त्र बनवणाऱ्या कारखान्यांवर असेल..

हल्ल्याचे इशारे दोन्ही देशांकडून दिले जात असतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांची बैठक घेतलीय...या बैठकीत ट्रम्प यांनी बोईंग, BAE सिस्टम, L3Harris मिसाईलचं उत्पादन चौपट करण्याचे आदेश दिलेत.. त्यामुळे इराणला बेचिराख केल्याशिवाय किंवा इराणमध्ये तख्तापलट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, हेच संकेत मिळतायत..मात्र इराणही निकाराला आल्यानं या युद्धात संपूर्ण जगाचीच होरपळ होत राहणार, हे निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : रविवार जाणार आनंदात, नवीन संधीमुळे उजळणार भाग्य; वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update : हातात मेणबत्या घेत हजारो महिलांसह नागरिक रस्त्यावर

PM Modi: 'मी आहे तोपर्यंत मोदी सत्तेत', केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

पोलीस विभागात मोठा फेरबदल; ३७ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? वाचा यादी...

Konkan Tourism : मालवणमध्ये लपलंय 'हे' सुंदर बेट, सौंदर्य पाहून परदेशातील मालदीव विसराल

SCROLL FOR NEXT