Missile strikes and nuclear tension between global powers raise fears of wider conflict. saam tv
देश विदेश

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

America and Israel Target Iran’s Nuclear Sites: आता जगात अणुयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे..कारण अमेरिका आणि इराणने अणुबॉम्बची चाचणी केल्याची चर्चा आहे. अणुयुद्ध भडकलं तर कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत ?.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

अमेरिका-इस्त्रायल इराणवर धडाधड मिसाईल हल्ले करत आहेत. तर इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर मिसाईलने दिवाळी साजरी केलीय.आता इराण काही थांबत नाही हे दिसत असतानाच अमेरिकेच्या अण्वस्त्रांचा साठा असलेल्या नेवाद प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवलेत. मात्र या भूकंपाच्या धक्क्यानंतर जगात एकच खळबळ उडालीय.

कारण एरिया 52 म्हणून ओळखला जाणारा हा अमेरिकेतील प्रदेश अण्वस्त्रांच्या चाचणीसाठी प्रसिद्ध आहे. आता इराण अमेरिकी हल्ल्यांना भीक घालत नसल्यानं इगो दुखावलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वंसक अणुचाचणी केलीय का? अण्वस्त्र हल्ला करुन ट्रम्प युद्ध थांबवणार का? मात्र हे प्रश्न इथेच थांबत नाहीत कारण याच वेळी इराणच्या फार्स प्रांतात 4.3 रिश्टर स्केल भुकंपाचे धक्के जाणवलेत.त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ इराणनेही अण्वस्त्रांची चाचणी केलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

कारण एरिया 52 म्हणून ओळखला जाणारा हा अमेरिकेतील प्रदेश अण्वस्त्रांच्या चाचणीसाठी प्रसिद्ध आहे. आता इराण अमेरिकी हल्ल्यांना भीक घालत नसल्यानं इगो दुखावलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वंसक अणुचाचणी केलीय का? अण्वस्त्र हल्ला करुन ट्रम्प युद्ध थांबवणार का? मात्र हे प्रश्न इथेच थांबत नाहीत कारण याच वेळी इराणच्या फार्स प्रांतात 4.3 रिश्टर स्केल भुकंपाचे धक्के जाणवलेत.त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ इराणनेही अण्वस्त्रांची चाचणी केलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

रशियाकडे 5 हजार 459, अमेरिकेकडे 5 हजार 277, चीनकडे 600, फ्रान्सकडे 290, ब्रिटनकडे 225, भारताकडे 180, पाकिस्तानकडे 170, इस्त्रायलकडे 90, तर उत्तर कोरियाकडे 50 , इटली 35, तुर्की 20, बेल्जियम 15, जर्मनी 15 आणि नेदरलँडकडे 15 अणुबॉम्ब आहेत.

खरंतर 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर शहरावर हल्ला केला. आणि त्यानंतर इगो दुखावलेल्या अमेरिकेनं जगात विध्वंस घडवणारे अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर डागले. आता इराणच्या अणु कार्यक्रमाचा कणा असलेल्या अरक अणु केंद्रावर इस्त्रायलने भीषण मिसाईल हल्ला करत हेवी वॉटर रिअॅक्टर सिस्टीम उद्ध्वस्त करुन टाकलीय.

इस्त्रायलने इराणच्या वर्मी घाव घातल्यानं चवताळलेल्या इराणनेही आता आरपारची रणनीती आखलीय. त्यामुळेच अमेरिकेचा इगो दुखावला गेलाय. त्यातच फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनन उघडपणे इराणविरोधात भूमिका घेतली.त्यामुळे आता जग अणुयुद्धाच सावट निर्माण झालंय. जगात सध्या 42 देशांमध्ये युद्ध सुरुय. त्यात ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने उडी घेतल्यास वेगवेगळ्या देशांचे 2 गट तयार होतील. त्यातूनच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. आणि तिसरं महायुद्ध भडकलं तर ते महाविनाशक असं अणुयुद्ध असेल आणि ज्यात संपूर्ण जगच नष्ट होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT