Missile strikes intensify as US-Iran conflict pushes the Gulf region toward a potential large-scale war. saam tv
देश विदेश

अमेरिकेनं इराणवर डागले टॉमहॉक मिसाईल, इराणणं उडवली अमेरिकेची 18 लष्करी तळं

Us Iran Conflict Missile Attacks Gulf War Risk: इराण-अमेरिका यांच्यातील पुन्हा एकदा संघर्ष वाढलाय... अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनंही चोख प्रत्युत्तर दिलंय... त्यामुळे आखाती देश पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळण्याची भीती व्यक्त केली जातेय... पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

रोेहित कदम, साम टीव्ही

अमेरिका आणि इराण यांच्यातील हवाई हल्ल्यांमुळे आखातातील तणाव टोकाला गेलाय. अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्यामुळे चवताळलेल्या अमेरिकेनं इराणवर अत्याधुनिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केलाय. तर अमेरिकेच्या कारवाईनं पेटलेल्या इराणनंही जोरदार

इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याच्या पॅट्रियट प्रणालीचे रडार आणि संप्रेषण अँटेना उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय, कुवेतमधील 'अली अल सलेम' आणि 'अहमद अल जुबेर' एअरबेस, बहरीनचा 'शेख ईसा' हवाई तळ आणि इराकच्या इरबिलमधील एअरबेससह एकूण 18 तळांवर इराणच्या जॉइंट मिलिटरी कमांडने जोरदार क्षेपणास्त्रं मारा केलाय. तर जॉर्डनमधील इस्त्रायलचं अजराक एअरबेस आणि थाड मिसाईल प्रणाली इराणनं भेदलीये. महत्त्वाचं म्हणजे, जॉर्डनमधील इस्त्रायलची मुख्य क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली आहेत.

इतकंच नव्हे तर इराणनं जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा होर्मुझ जलमार्ग पुर्णपणे बंद केलाय. दरम्यान, इराण-अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रानंही गंभीर इशारा दिलाय. तात्काळ हल्ले थांबवून मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रानं केलंय. इराणनं अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ला केल्यानं कुवेत, बहरीन आणि जॉर्डनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीये. या देशांतील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहनही करण्यात आलंय. त्यामुळे इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT