US airstrikes near Iran’s Bandar Abbas naval base intensify tensions, raising fears of a wider Middle East conflict. saam tv
देश विदेश

अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला, इराणही अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत

US Airstrikes on Iran Raise Fears of Fresh Middle East Conflict: इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा वाढला असून अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जातेय.

Saam Tv

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही संपायचं नाव घेत नाहीये. कतारची राजधानी दोहामध्ये दोन्ही देशांत युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेनं इराणवर हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे आखातातील युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जातेय. इतकंच नव्हे तर अमेरिकेवर हवाई हल्ल्यानंतर इराणनं पुन्हा एकदा युद्धाची तयारी केल्याची चर्चा रंगू लागलीये. अमेरिकेनं इराणवर नेमकी काय कारवाई केलीये पाहूयात...

अमेरिकेनं दक्षिण इराणमधील 'बंदर अब्बास' या मुख्य नौदल तळाजवळ भीषण हवाई हल्ले केले. इराणमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ, सागरी मार्गात स्फोटके ठेवणाऱ्या बोटी यांसह अनेक ठिकाणी स्वसंरक्षणार्थ हल्ले केल्याची माहिती अमेरिकेनं दिलीये. या हल्ल्यांमध्ये बोटींवरील इराणचे चार सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आलीये.

हवाई हल्ल्यांदरम्यान अमेरिकेचं 'एमक्यू-९ रीपर' ड्रोन पाडल्याचा दावा इराणनं केलाय. एकीकडे, इराणसोबत तात्पुरता युद्धविराम झालेला असतानाही, अमेरिकेनं इस्रायलमधील आपलं लष्कर कमी केलेलं नाहीये. तर दुसरीकडे, लष्करी सज्जता आणि मुस्लिम देशांना एकत्र आणण्याची खेळी इराणनं खेळलीये. या दोन्ही देशांतील कुरघोडीमुळे जगाची इंधन कोंडी झाली असताना आता मात्र कतारमध्ये सुरू झालेल्या चर्चेत अमेरिका इराणची सागरी नाकेबंदी हटवण्यास तयार झालीये. तर या बदल्यात इराण होर्मुझ जलमार्ग खुला करणार आहे. या सामंजस्य करारावर आता दोन्ही देश कशी अंमलबजावणी करतात याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT