US Presidential Election 2024 Saam tv
देश विदेश

Donald Trump : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार! डोनाल्ड यांच्या विजयाने भारतावर काय परिणाम होणार?

Donald Trump Latest News : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार विराजमान झालं आहे. डोनाल्ड यांच्या विजयाने भारतावर निश्चित मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले आहेत. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळालं आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या आता पुन्हा एकदा ट्रम्प यांच्याकडे आल्या आहेत. अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालांचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. अमेरिकेच्या या निवडणुकीचा आंतराष्ट्रीय घडामोडींवर काय प्रभाव पडेल? ट्रम्प यांच्या विजयाची काय प्रमुख कारणे आहेत? त्यांच्या विजयाने भारतावर काय परिणाम होईल, याविषयी आंतराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यास विनय चाटी यांनी मोठं भाष्य केलं आहे.

अमेरिकेची निवडणूक कुठल्या मुद्दयांवर गाजली?

'ट्रम्प यांच्या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे बदलेली भूराजकीय परिस्थिती आहे. अमेरिकेत एक केंद्र सत्ता होती. त्यावर धक्के बसायला सुरुवात झाली. मध्य आशियामिबद्दल निर्णय, चीन या देशाबद्दल घेतलेली भूमिकात, उत्तर कोरियाशी बिघडलेले संबंधावर निवडणूक गाजली. इकॉनॉमिक रिव्हायटल आणि अमेरिकेमध्ये झालेलं विस्थापनामुळे फटका बसला. इकॉनोमिक रिवायटलायझेशन आणि वाढतं अवैध स्थलांतराचा मुद्दा चांगलचा गाजला, असे आंतराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यास विनय चाटी यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची प्रमुख कारणे काय आहेत?

विनय चाटी म्हणाले, 'रिपब्लिकन राष्ट्रवादी म्हणून मानले जातात, तर डेमोक्रेटिक हे डावे मानले जातात. मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन हे वाक्य अमेरिकी नागरिकांना भावले. विस्थापितांना बाहेर काढावं अशी अमेरिकेची मागणी आहे. मेक्सिको आखातमध्ये सीमा घालून बंद करावे याला ट्रम्पचे समर्थन आहे. ट्रम्प यांचा राष्ट्रवादी दृष्टीकोन अमेरिकेतील लोकांच्या मनात रुजला आहे. युक्रेनला शास्त्र फुकट देऊ नये. रशियासाठी ही भूमिका महत्वाची असावी.

ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष! भारतावर परिणाम काय?

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसलेले स्टेट्समन आहेत. दोघांमध्ये चांगले संबंध दिसले आहेत. दोन्ही नेत्यांची व्यवहारातील केमिस्ट्री पाहिली तर दोघांमध्ये संवर्धाचे संबंध आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षी संबंध मजबूत होतील. २ लोकशाही असलेल्या देशातील नातं येत्या काळात वृध्दींगत होईल. जेव्हा रिपब्लिकन यांची सत्ता अमेरिकेत आली, तेव्हा तेव्हा भारतासोबत त्या राष्ट्राध्यक्ष यांचे संबंध वरच्या स्तरावर गेले आहेत, असे चाटी पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT