US COVID-19 Update Saam Tv
देश विदेश

US COVID Update: अमेरिकेत कोरोनाचा कहर, 24 तासात 10 लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना (Corona) च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

US COVID Update: अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना (Corona) च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोमवारी (3 जानेवारी) अमेरिकेत 10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रविवारी एका दिवसात सुमारे 5,91,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या 1,03,000 पेक्षा जास्त लोक COVID-19 मुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. अमेरिकेत गेल्या चार महिन्यात रुग्णालयात दाखल होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे (US COVID Update Latest News).

यूएस (US) फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) सोमवारी जाहीर केले की त्यांनी 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना Pfizer-BioNTech बूस्टर लस देण्यासाठी इमरजेंसी यूज ऑथोराइजेशन (ईयूए) जारी केली आहे. याद्वारे त्यांना कोरोनापासून संरक्षण मिळू शकेल. गेल्या सात दिवसांच्या कालावधीत यूएस आरोग्य अधिकार्‍यांनी ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराच्या वाढत्या प्रसारादरम्यान दररोज सरासरी 3,20,000 नवीन प्रकरणे नोंदवली आहेत. अशाप्रकारे, एका आठवड्यात 21 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा -

ओमिक्रॉन व्हेरिएंट ऑफ कंसर्न म्हणून घोषित

कोरोनाचा वेगाने पसरणारा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबरमध्ये आढळला होता. या प्रकारातील अधिक म्यूटेशन (Mutation) लक्षात घेऊन, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केले होते. आफ्रिकेवर प्रवास निर्बंध लादले असूनही या प्रकाराने युरोप, आशिया आणि अमेरिकेवर हल्ला बोलला. जगभरातील आरोग्य तज्ञांनुसार, ओमिक्रॉन आणखी पसरण्याची शक्यता अधिक आहे. परंतु त्याची लक्षणे सौम्य आहेत. मात्र, त्यानंतरही धोका कायम असून लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यूएस कोव्हिड-19 (COVID-19) प्रकरणांमध्ये झालेल्या स्फोटानंतर, सोमवारी काही शाळांनी सुट्टीचा कालावधी वाढवलाय किंवा ते ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर परतले आहेत. अमेरिकन लोकांना आता कोरोनासोबतच जगणं शिकावं लागेल, याअर्थी इतर शाळांनी ऑफलाईन वर्ग चालू ठेवले. मात्र, आता पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT