अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण कर त्यावर ताबा घेतलाय. अमेरिकेच्या तीन सैन्या दलांनी ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू करत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतलंय. या जागतिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर कोरियानेही यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेल इशारा दिलाय. मादुरो हे आपले 'मित्र' असल्याचं सांगत अमेरिकेला उघडपणे महायुद्धाचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांनी अमेरिकेला कठोर शब्दांत इशारा दिलाय.
ही कारवाई जगाला महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकते, असं उत्तर कोरियानं म्हटलंय. तसेच किम जोंग-उन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन नेतृत्वाकडे मागणी केली आहे की, त्यांनी तातडीने निकोलस मादुरो यांची सद्यस्थिती जाहीर करावी. मादुरो हे आपले मित्र आहेत. अमेरिकेचं हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची लगेचच सुटका करण्यात यावी, त्यांना तातडीने सोडा अन्यथा याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील असा इशारा किम जोंग-उन यांनी दिलाय.
दरम्यान रशियानेही अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केलाय. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात 'सशस्त्र आक्रमकता' दाखवलीय. ही अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. अमेरिकेने दिलेले तर्क निराधार आहेत. हे पाऊल मुत्सद्देगिरीऐवजी वैचारिक शत्रुत्वाने प्रेरित आहे. मॉस्कोने सर्व बाजूंना तणाव वाढवणं टाळण्याचं आणि चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन केलंय.
अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. काराकाससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने आपल्या ताब्यात घेतलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.