देश विदेश

Madhya Pradesh Pravesh Shukla Case: तरुणावर लघवी प्रकरण! अटकेनंतर भाजप नेता प्रवेश शुक्लाच्या घरावर प्रशासनाने चढवला बुलडोझर, VIDEO आला समोर

MP Urinated On Tribal Labourer Case: परवेश शुक्ला नावाच्या भाजप नेत्याने (BJP Leader Pravesh Shukla) एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघवी केली होती.

Priya More

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओने (Viral Video) एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये परवेश शुक्ला नावाच्या भाजप नेत्याने (BJP Leader Pravesh Shukla) एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघवी केली होती.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक केली आहे. त्याचवेळी तरुणावर लघवी प्रकरणातील (urinated on tribal labourer case) आरोपी प्रवेश शुक्ला याच्या बेकायदेशीर निवासस्थानावर आता प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आदिवासी व्यक्तीच्या तोंडावर लघवी करताना दिसत आहे. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी भाजपचा नेता प्रवेश शुक्लाला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते प्रवेश शुक्लाला कुबरी गावातील खैरहवा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२३, १२३, २९४, ५०६ आयपीसी आणि एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी प्रवेश शुक्लाला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. तो सध्या तुरुंगात असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्याविरोधात एनएसए नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. प्रवेश शुक्लाच्या घरावर बुलडोझल चालवण्यात आला त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी विरोध केला.

याप्रकरणी पीडित आदिवासी व्यक्तीच्या पत्नीने एएनआयला सांगितले की, 'तो माझा पती आहे. जर चूक केली असेल तर जे व्हायचं आहे ते होईल. काही चूक केली असेल तर शिक्षा झालीच पाहिजे.' तिला विचारण्यात आले की तिच्यावर कोणी दबाव आणत आहे का? पोलीस त्रास देत आहेत का? तर यावर तिने नाही असे उत्तर दिले. ज्या आदिवसी व्यक्तीवर प्रवेश शुक्लाने लघवी केली तो मजूरीचे काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

Maharashtra Politics: राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आमनेसामने; एकाच सोफ्यावर बसले पण नजरानजर टाळली|VIDEO

Nagpur Crime: धक्कादायक! जुन्या घरगुती वस्तूंची विकणाऱ्याला जबर मारहाण; पाकिस्तानी समजून डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

SCROLL FOR NEXT