Delhi News: बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांचा कास्टिंग डायरेक्टर आणि अॅक्टिंग कोच मयंक दीक्षित (Casting Director Mayank Dixit) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरामध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मयांकच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) सुरु आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कास्टिंग डायरेक्टर मयंक दीक्षित यांना रविवारी रात्री उशिरा लक्ष्मी नगर परिसरात मारहाण करण्यात आली. कार रिव्हर्स घेण्यावरुन मयंकचे काही लोकांसोबत वाद झाला. या वादानंतर या लोकांनी मयंकला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मयंकच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी झालेल्या मयंकवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.
मयंकच्या इंस्टाग्राम अकाऊंटनुसार, त्याने संजय दत्तच्या 2020 च्या 'तोरबाज' चित्रपटासाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे. अफगाणिस्तानात आधारित, ही कथा लहान आत्मघाती हल्लेखोरांची आहे. संजय दत्त एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत मयंकने इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, 'या अद्भूत मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी मला खूप छान वेळ मिळाला, ज्यांनी एक उत्कृष्ट काम केले आहे! ते खरोखरच रत्न होते... ते सर्व अद्वितीय होते!'
त्याशिवाय, मयंकने सलमान खानच्या 2008 च्या 'युवराज' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या चित्रपटामध्ये जायेद खान, अनिल कपूर आणि कतरिना कैफ यांनी काम केले आहे. तसंच, मयंक दीक्षितने राहुल बोस आणि कार्तिक आर्यनच्या 'कांची' (2014), 'पूर्णा: करेज हॅज नो लिमिट' (2017) साठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.