UPSC Saam Tv
देश विदेश

UPSC IES ISS Result 2023: भारतीय आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर, निश्चल मित्तल देशात पहिला

UPSC Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगने (UPSC) भारतीय सांख्यिकी सेवा (IES) परीक्षा 2023 आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2023 चे अंतिम निकाल जाहीर केले आहेत.

Satish Kengar

UPSC IES ISS Result 2023:

केंद्रीय लोकसेवा आयोगने (UPSC) भारतीय सांख्यिकी सेवा (IES) परीक्षा 2023 आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2023 (UPSC IES ISS Result 2023) चे अंतिम निकाल जाहीर केले आहेत. आयोगाने बुधवार, 24 जानेवारी 2024 रोजी दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर केले.

यासोबतच यूपीएससीने दोन्ही परीक्षांमध्ये निवडलेल्या एकूण 53 उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. भारतीय आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षांना बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यूपीएससीद्वारे जारी केलेल्या आइईएस परीक्षा 2023 निकाल (UPSC IES Result 2023) अधिसूचनेनुसार, यावेळी निश्चल मित्तल परीक्षेत अव्वल ठरला आहे. यानंतर अदिती झा दुसऱ्या क्रमांकावर आणि पूर्णिमा सुदेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Latest Marathi News)

त्याचप्रमाणे, यूपीएससीने प्रकाशित केलेल्या आयएसएस परीक्षा 2023 निकाल (UPSC ISS Result 2023) अधिसूचनेनुसार, निखिल सिंग या परीक्षेत देशात पहिला आला आहे. यानंतर जान्हवी पटेल दुसऱ्या क्रमांकावर आणि विजय लढा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांचा निकाल तात्पुरता प्रलंबित ठेवण्यात आला आहे. अशा उमेदवारांची नियुक्ती अशा उमेदवारांकडून प्रलंबीत असलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेपर्यंत आणि या उमेदवारांची तात्पुरती स्थिती स्पष्ट करेपर्यंत आयोग जारी करणार नाही. या उमेदवारांच्या तात्पुरत्या निकालाची मुदत अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठीच वैध राहील. या कालावधीत आयोगाला आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यात उमेदवार अपयशी ठरल्यास, त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT