Etawah Road Accident News:  Saamtv
देश विदेश

UP Road Accident: चालकाला डोळा लागला, होत्याचं नव्हतं झालं! सुसाट कार थेट ट्रकमध्ये घुसली; पती पत्नीसह एकाच कुटुंबातील ४ ठार

Etawah Road Accident News: कानपूर- आग्रा महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

उत्तरप्रदेश, ता. २१ ऑगस्ट २०२४

उत्तर प्रदेशमधील इटावामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आग्रा- कानपूर महामार्गावर चालकाला डोळा लागल्याने भरधाव कार ट्रकला धडकली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उत्तरप्रदेशमध्ये भीषण अपघात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील इटावा येथे बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. कानपूर- आग्रा महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील मृत आणि जखमी झालेले एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौघांचा जागीच मृत्यू

अपघात झालेली एर्टिगा कार दिल्लीहून हमीरपूरला जात होती. गाडीमध्ये एकाच कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. यावेळी पिलखार गावाजवळ चालकाला डोळा लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात इतका भयंकर होता की कार थेट ट्रक तोडून आतमध्ये शिरली. बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. चारही मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. २ जखमींना सैफई येथे रेफर करण्यात आल्याची माहिती इटावा जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचे डॉक्टर श्याम मोहन यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT