Bjp Mp Vs NDA Mla: Supporters Clash At Up Government Event 
देश विदेश

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून NDAच्या आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

MP-MLA Supporters Fight : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात भाजप खासदार जगदंबिका पाल आणि अपना दलच्या आमदाराच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे एका सरकारी कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाला. खासदार जगदंबिका पाल आणि अपना दल (एस) चे आमदार विनय शर्मा यांचे समर्थक एकमेकांशी भिडले. यात आमदाराला मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. ही घटना बरहनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायाभरणी समारंभादरम्यान घडली. व्यासपीठावरून आमदाराच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे हा वाद सुरू झाला आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

आमदाराने आरोप केला आहे की, त्यांचा पक्षकार्यकर्ता प्रदीप याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप अपना दलच्या आमदारानं आरोप केलाय. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, खासदाराने या हल्ल्यात आपल्या समर्थकांचा सहभाग नव्हता असं म्हटलंय.

सिद्धार्थनगर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे आयोजित एका शिलान्यासच्या कार्यक्रमात डुमरियागंजचे खासदार जगदंबिका पाल आणि आमदार विनय वर्मा यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. कार्यक्रमादरम्यान आमदारांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे मंचावरच समर्थकांची हाणामारी झाली. ही घटना बार्धनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे (PHC) सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) रूपांतर करण्यासाठी आयोजित केलेल्या पायाभरणी आणि 'भूमीपूजन' समारंभादरम्यान घडली.

पीडित प्रदीप कमलपुरी यांनी सांगितले की, खासदारासोबत आलेल्या काही व्यक्तींनी स्थानिक आमदार विनय वर्मा यांचे नाव मंचावरून घेऊ नये, अशी मागणी केली. आम्ही याला विरोध केला असता, खासदारचे समर्थक संतप्त झाले आणि अचानक मंचावर चढले. नेमके काय घडत आहे हे समजण्यापूर्वीच, त्यातील काहींनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मला मारहाण केली.

मंचावर हाणामारी

या कार्यक्रमाबद्दल सांगायचे तर, आरोग्य विभागाने बधानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीसुधारणेसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १९ कोटी ६६ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प होता. स्थानिक खासदार जगदंबिका पाल हे कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचले. दरम्यान स्थानिक आमदार विनय वर्मा यांचे समर्थक मंचावर उपस्थित होते आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.

दरम्यान, खासदार जगदंबिका पाल यांचे समर्थक घोषणा देत तिथे पोहोचले आणि त्यांनी मंचावरून बोलत असलेल्या उद्घोषक जुग्गी राम राही यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आमदारांचे समर्थक प्रदीप कमलपुरी यांनी याला आक्षेप घेतला तेव्हा हाणामारी सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई

Clothes Drying Tips: कपडे धुतल्यानंतर किती वेळात वाळत घालावेत? जाणून घ्या योग्य पद्धत

Malvan : थंडगार वाऱ्यांसोबत अनुभवा मालवणचे सौंदर्य, स्वर्गाहून सुंदर आहेत 'ही' ६ ठिकाणे

ऋषभ पंतचा मोठा पराक्रम! WTC मध्ये नव्या विश्वविक्रमाशी बरोबरी; रोहित शर्मा कितव्या क्रमांकावर?

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या महापौरांनी प्राशन केलं विष; आमदारांचा धक्कादायक खुलासा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT