Surabhi Jayashree Jagdish
कपडे धुतल्यानंतर ते जास्त वेळ बादलीत किंवा मशीनमध्ये ठेवल्यास त्यांना कुबट वास येऊ शकतो. ओलसर आणि बंद जागेत कपडे ठेवल्यामुळे त्यांच्यावर बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर जास्त वेळ तसेच न ठेवता लवकर वाळत घालावेत.
रात्रभर ओले कपडे बादलीत किंवा मशीनमध्ये ठेवल्यास सकाळपर्यंत त्यांना उग्र वास येऊ शकतो. कपड्यांमध्ये ओलावा जास्त वेळ राहिल्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्याची शक्यता असते. अशा कपड्यांना वास येत असल्यास ते पुन्हा धुऊन वाळत घालावेत.
कपडे धुऊन झाल्यानंतर मशीनमधून किंवा बादलीतून ते लगेच बाहेर काढावेत. कपड्यांमधील अतिरीक्त पाणी निघून जाण्यासाठी त्यांना व्यवस्थित पिळा. त्यानंतर कपडे मोकळ्या जागेत वाळत घालावेत, जेणेकरून त्यांना हवा लागेल.
कपडे वाळत घालताना ते एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रत्येक कपड्याच्या मध्ये थोडी जागा ठेवल्यामुळे हवा खेळती राहते आणि कपडे लवकर वाळण्यास मदत होते. कपडे एकावर एक टाकून वाळत घालणं टाळावं कारण त्यामुळे आतील कपडे ओले राहू शकतात.
कपडे धुतल्यानंतरही त्यांना कुबट वास येत असेल तर ते पुन्हा धुवावेत. कपडे धुताना योग्य प्रमाणात साबण किंवा कपडे धुण्याचं लिक्विड वापरावं. त्यानंतर कपडे पूर्णपणे वाळेपर्यंत हवेशीर जागेत ठेवावेत.
कपडे वाळत घालण्यासाठी मोकळी आणि हवेशीर जागा निवडणं चांगलं असतं. बाहेर ऊन आणि हवा मिळत असल्यास कपडे लवकर वाळतात. पण धूळ आणि प्रदूषणापासून त्यांचा बचाव करावा. बाहेर कपडे वाळवणं शक्य नसेल तर घरात खिडकीजवळ किंवा हवा खेळती राहील अशा ठिकाणी कपडे वाळत घालावेत.
कपडे धुतल्यानंतर शक्यतो लगेच किंवा ३० मिनिटांच्या आत वाळत घालावेत. जास्त वेळ ओले कपडे मशीनमध्ये किंवा बादलीत ठेवणं टाळावं. कारण त्यामुळे त्यांना कुबट वास येऊ शकतो. काही कारणामुळे लगेच कपडे वाळत घालणं शक्य नसेल, तर ते जास्त वेळ साचवून न ठेवता शक्य तितक्या लवकर बाहेर काढावेत.