UP Election 2022: ''मी पुन्हा येईन'' - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा Saam Tv News
देश विदेश

UP Election 2022: ''मी पुन्हा येईन'' - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा

महाराष्ट्रात २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही एका भाषणात ''मी पुन्हा येईन'' असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण, ते आता विरोधी पक्षात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ३५० जागा जिंकुन स्वतःचाच रेकॉर्ड मोडणार असल्याचं भाकीत करत मी पुन्हा येईन असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. देशातील पाच राज्यात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र भाजपने या निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरु केल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेशातही २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. (UP Election 2022: "I will come again" - Chief Minister Yogi Adityanath's claim)

हे देखील पहा -

उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदावर आपणच पुन्हा येऊ अशी भविष्यवाणी केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पुढे ते म्हणाले की, भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वतःतचाच रेकॉर्ड मोडत ३२५ ते ३५० जागा जिंकणार आहे. मागच्या वेळी भाजपने ३१२ जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या १० महिन्यापासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरु आहे त्याचा आपल्या मतांवर काहीही परिणाम होणार नसल्याचही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारची कामगिरी, आर्थिक विकास, कायदा व सुव्यवस्था पाहता भाजप पुन्हा जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे

देशातल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे तर, उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली आहे. पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे तर मणिपूरसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसते आहे.

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका भाषणात ''मी पुन्हा येईन'' असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण, ते आता विरोधी पक्षात आहेत. भाजपला १०५ जागा मिळूनही पराभव पत्कारावा लागला. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ४०३ सीट्स आहेत, बहुमतासाठी २०२ जागा जिंकणे आवश्यक आहे. भाजपने सुमारे ३१२ जागा जिंकल्या होत्या. मात्र कोविडच्या काळात झालेले आरोप, बलात्कार आणि गुन्ह्यांचा वाढता आकडा, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यावरुन भाजपला या निवडणुकीत तोंड द्यावे लागेल हे मात्र नक्की.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT