UP, CMO Saam Digital
देश विदेश

UP, CMO: नसबंदीनंतरही ८ महिला राहिल्या गरोदर, आरोग्य विभागात माजली खळबळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UP, CMO

उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात नसबंदीनंतरही आठ महिला गरोदर राहिल्यामुळे खळबळ माजली आहे. संबंधित महिलांना मेडिकल तपासणीत याची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र ही नियमित प्रक्रिया असल्याचं कारण दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एक दोन नाही कर एकाचवेळी तब्बल आठ प्रकरणे आढळल्यामुळे बांदा आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. महिलांनी याबाबत मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यावर सारवासारव करताना आरोग्य विभागाने ही नियमित प्रक्रिया असून राजपत्रात नमूद असल्याचं अजब स्पष्टीकरण दिलं आहे. यावर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी संबंधित महिलांना ६०-६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देण्यात आलं असून प्रशासन कागदपत्रं गोळा करण्याच्या तयारीला लागलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोग्य खात्याकडून 'हम दो हमारे दो'ची घोषणा दिली जाते. कुटुंबनियोजनासाठी नसबंदी शिबिरं आयोजित केली जातात. यामध्ये महिलांसोबत पुरुषही मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात. मात्र बांदामधील या महिलांची फसवणूक झाली आहे. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालयासह अनेक सीएचसींना सरकारकडून कुटुंबनियोजनाचे टार्गेट पण दिलं जातं. त्यामुळे नसबंदीनंतर महिला निश्चित होतात. मात्र या प्रकारामुळे महिलांचं मतपरिवर्तन होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबेरू आरोग्य केंद्रात ३, बिसंडामध्ये २, बडोखर आणि जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक महिला नसबंदीनंतर गरोदर राहिली आहे. या महिलांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यांनतर त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या कामाला आरोग्य विभाग लागले आहे. नसबंदी करताना कधी कधी असे प्रकार घडतात. एखाद्या प्रकरणामध्ये नस बांधताना अडचण येऊ शकते, त्यावेळी दुसऱ्या बाजूने गर्भधारणा होण्याची शक्यता असते, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

बांदाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कुमार यांनी ही एक नियमित प्रक्रिया असल्याचं कारण दिलं आहे. मागच्या काही वर्षात अशी प्रकरणे समोर आली आहेत . ज्यावेळी नसबंदीत गडबड होते त्यावेळी पुढच्या तीन महिन्यात त्या महिलेला नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. या संबंधित फाईल सरकारला पाठवल्या जातात आणि ६० हजार रुपये मदत दिली जाते. कधी कधी लोक दावा पण दाखल करतात. सध्या या महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मात्र याला निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT