undp report Saam tv
देश विदेश

युद्धाची झळ, भारताला फटका; युद्धामुळे 25 लाख भारतीय गरीब होणार? VIDEO

undp report india poverty war impact : युद्धामुळे अनेक देश गरिबीच्या खाईत लोटले जाणार आहेत... त्यातच 25 लाख भारतीय गरीब होण्याचा मोठा इशारा UNDP नं दिलाय.... युद्धामुळे जगातील कोणते देश गरिबीच्या खाईत लोटले जाणार आहे... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जगात कुठेही युद्ध झालं तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत असतात.. रशिया- युक्रेन युद्धावेळी जगावर आर्थिक संकट कोसळलं होतं.त्यातच सुरू झालेलं आखाती युद्ध आता भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे...संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच 'यूएनडीपी'च्या (UNDP) अहवालानं अनेक देशाची झोप उडवलीय... या अहवालात काय लिहलंय... पाहूयात...

युद्धामुळे इराणमध्ये 50 लाखाहून अधिक लोक गरिबीत ढकलले जातील... त्यानंतर भारतात 24 लाख 64 हजार 698 लोकं गरिबीच्या खाईत लोटले जातील... त्याशिवाय चीनमध्ये 6 लाख 22 हजार 735 तर पाकिस्तानात 4 लाख 21 हजार 964 दारिद्र्य रेषेखाली जातील.

दरम्यान यूएनडीपीच्या अहवालानुसार, सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात कोणत्या क्षेत्रातील कामगारांना याचा जास्त फटका बसेल... पाहूयात...

ऊर्जा आणि इंधन क्षेत्राशी संबंधित उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल..

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होऊन वाहतुक महागेल.. ज्यामुळे भाजीपाला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील...

निर्यात-आयात क्षेत्रालाही युद्धाची झळ बसेल...

कापड उद्योग, चामड्याच्या वस्तू आणि हिरे-दागिने यांच्या निर्यातीवर परिणाम होऊन असंघटित कामगार बेरोजगार होतील..

90 टक्के रोजगार हा असंघटित क्षेत्रात असल्यानं. हॉटेल, बांधकाम, अन्नप्रक्रिया, स्टील आणि दागिने उद्योगातील कामगारांच्या बेरोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशिया किंवा आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या 93.7 लाख भारतीय कामगारावरही संकट कोसळेल...

दरम्यान युद्धामुळे एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे गगनाला भिडणारी महागाई, अशा दुहेरी कात्रीत भारतीय नागरिक अडकण्याची चिन्हे आहेत. मात्र युद्धामुळे उद्भवणारं हे आर्थिक संकट टाळण्यासाठी भारताला आतापासूनच इंधन आणि खतांच्या पर्यायी मार्गांचा विचार करावा लागणार आहे, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT