United Kingdom Elections 2024 Saam Digital
देश विदेश

United Kingdom Elections 2024 : ब्रिटनमधील निवडणुकीचा निकाल १८ लाख भारतीयांच्या हातात; ऋषी सुनक यांचं काय होणार?

Britain Election : ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ५ कोटी मतदारांच्या हातात इंग्लंडचं राजकीय भवितव्य असून उद्या ५ जुलै रोजी निकाल लागणार आहे. यात हिंदू मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

Sandeep Gawade

ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी मजूर पक्षाचे कीर स्टार्मर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. या सार्वत्रिक निवडणुकीत ५ कोटी मतदारांच्या हातात देशाचं राजकीय भवितव्य असणार आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही दोन्ही पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हिंदूंना आकर्षित करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.

मतदानाच्या काही दिवस आधी म्हणजेच २८ जून रोजी मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात पूजा केली. त्यानंतर लगेचच 30 जून रोजी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती मंदिरात पूजा केली होती. ब्रिटीनच्या निवडणुकीत हिंदू मतदारांची ताकद किती मोठी आहे. याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो.

YouGov च्या सर्वेक्षणानुसार, यावेळी भारतीय मतदार सुनक यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे सुनक यांना भारतीयांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. 65 टक्के भारतीय मतदार सुनक यांच्या पक्षाच्या विरोधात आहेत. सुनक यांच्या कार्यकाळात भारतीयांसाठी कोणतेही मोठे पाऊले उचलली गेले नाहीत, असं भारतीयांचं मत आहे.

ब्रिटनमध्ये 6 महिने आधी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज 4 जुलै रोजी सकाळीच मतदानाला सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार ५ जुलैला मतमोजणी सुरू होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होतील. ब्रिटनमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान केलं जातं. केवळ ब्रिटनचे नागरिकच नाही तर भारतीय, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलियन यांसारख्या देशांतील नागरिकही निवडणुकीत मतदान करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कावळा काळ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या या प्रश्नाचे आश्चर्यकारक उत्तर

Maharashtra Live News Update: मुलुंडमधील काही भागांत आज पाणीपुरवठा बंद!

Maharashtra Monsoon Alert : मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या सविस्तर

Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

SCROLL FOR NEXT