Beggars Law saamtv
देश विदेश

Beggars Law: भीक द्याल तर जेलमध्ये जाल; भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा

Beggars Law: तुम्ही भिकाऱ्यांना भीक देत असाल तर सावध व्हा. कारण, तुम्ही भीक द्याल तर थेट जेलमध्ये जाल. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल. मात्र हे खरंय कारण तुम्ही भीक दिली तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो. देशात नव्या वर्षात नवा कायदा लागू केला जाणाराय... नेमका काय आहे कायदा आणि कधी लागू होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

जर तुम्ही भीक देऊन पुण्य कमावण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण आता भिकाऱ्याला भीक देणं हा गुन्हा ठरणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्याला भीक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा झालाय. त्यामुळे पुण्य कमावण्याच्या नादात तुम्ही थेट तुरुंगात जाऊ शकता.

भिकाऱ्यांना भीक देणं गुन्हा का झालाय पाहुया..

भीक द्याल तर जेलमध्ये जाल

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची भिकारी मुक्त शहरं करण्याची मोहीम

भीक मागण्याविरोधात जनजागृतीसाठी इंदूरमध्ये मोहिमेला सुरुवात

भीक मागण्यावर बंदी घालण्याचे प्रशासनाचे आदेश

भीक देताना पकडला गेला तर गुन्हा दाखल होणार

जिल्हाधिकाऱ्यांनी भीक न देण्याचं केलं आवाहन

भिकारी मुक्त शहरं करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मोहिमेदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झालेत. यावेळी अनेक भिकाऱ्यांची पक्की घरं आहेत, काहींची मुलं ही बँकेत काम करतात तर काही भिकाऱ्यांनी व्याजानं पैसे दिल्याचा खुलासा प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलाय. या मोहिमेची अंमलबजावणी करतांना ३० ते ४० भिकाऱ्यांची सुटका केल्याचं देखिल सांगितलंय.

मध्य प्रदेशात हा निर्णय झाला. नवीन वर्षापासून तिथं या निर्णयाची अंमलबजावणी होणारेय. परंतू केवळ शहर भिकारीमुक्त करण्यापेक्षा त्या भिकाऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांना भिक मागण्यापासून परावृत्त करणं हे देखिल तितकंच महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT