New Maharashtra Sadan Water Shortage Saam TV
देश विदेश

VIDEO : केंद्रीय मंत्र्याला करावी लागली बिसलरीच्या पाण्याने अंघोळ; नवीन महाराष्ट्र सदनाला दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका

New Maharashtra Sadan Water Shortage : पाणी नसल्यानं दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणाऱ्या लोकांचे हाल होतायत. अशात पाणी संपल्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला थेट फिल्टर पिण्याच्या बॉटलने (बिसलरीच्या पाण्याने) अंघोळ करावी लागली आहे.

Ruchika Jadhav

दिल्लीतील भीषण पाणीटंचाईचा सामना आता नवीन महाराष्ट्र सदनातील व्यक्तींना देखील सहन करावा लागत आहे. पाणी नसल्यानं दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणाऱ्या लोकांचे हाल होतायत. अशात पाणी संपल्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला थेट फिल्टर पिण्याच्या बॉटलने (बिसलरीच्या पाण्याने) अंघोळ करावी लागली आहे.

दिल्लीत पाणी नसताना महाराष्ट्र सदनाने कोणतंही नियोजन न केल्यानं सदनाच्या नियोजनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या अगोदरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशात आता देखील पाणीटंचाईने थेट केंद्रीय मंत्र्यांवर अशी वेळ ओढावली आहे.

राजधानीत भीषण पाणीटंचाई

एकीकडे उन्हाचा पारा वाढला आहे. देशभरात काही ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलाय. मात्र अद्यापही हवा तसा पाऊस पडलेला नाही. परिणामी राजधानी दिल्लीमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

यमुना नदीतील पाणी पातळी मोठ्याप्रमाणात कमी झालीये. त्यामुळे दिल्लीवर पाणीटंचाईचं संकट ओढावलंय. त्यामुळे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या मुद्द्यावरून ३१ मे रोजी केजरीवाल सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राजधानीत पाण्याची समस्या भेडसावत असून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांकडून एक महिनाभर अतिरिक्त पाणी देण्यात यावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT