MP Giriraj Singh Attack Latest News:  Saamtv
देश विदेश

Union Minister Attack: मोदींच्या मंत्र्यांवर जनता दरबारमध्ये हल्ला, तरुणाकडून धक्काबुकी, नेमकं प्रकरण काय?

MP Giriraj Singh Attack Latest News: आरोपी तरुणाने गिरीराज सिंह यांना धक्काबुक्की केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले. तसेच हल्लेखोर तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले.

Gangappa Pujari

एनडीए सरकारमधील केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये येथे ही घटना घडली. बलिया येथे शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह सहभागी झाले होते. याचवेळी एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी तात्काळ ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बलिया उपविभागात लोकांना भेटून लोकांच्या अडचणी ऐकत होते, त्याचवेळी सैफी नावाचा एक मुस्लिम तरुण तेथे आला आणि त्याने आधी माईक ताब्यात घेतला आणि अश्लील वक्तव्य करण्यास सुरुवात केली. त्याला भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी याचा निषेध केला असता आरोपी तरुणाने गिरीराज सिंह यांना धक्काबुक्की केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले. तसेच हल्लेखोर तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले.

स्वत:वर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळे स्वत:ला कट्टरवादी मुस्लिम म्हणवणाऱ्या लोकांचे मनोबल वाढले असून ते एका खासदारावरही हल्ला करण्यास मागे हटत नाहीत, गिरीराज सिंह म्हणाले.

तसेच त्याची दाढी आणि टोपी पाहून त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांनी आज बेगुसराय, बिहारसह संपूर्ण देशात लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि जातीय तेढ कसे निर्माण केले जात आहे ते पहावे, आम्ही अशा घटनांना घाबरत नाही. हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हावे लागेल, अन्यथा अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यासारखे लोक भारताला इस्लामिक देश बनवतील, असेही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? या दिवशी ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Facial Hair Remover: घरातील 'या' तीन सामग्रीची पेस्ट वापर चेहऱ्यासाठी, कधीच होणार नाही फेशल हेअर प्रॉब्लेम

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT