देश विदेश

Election Commission: विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; हरियाणात एकाच टप्प्यात होणार मतदान

Assembly Election: हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने फक्त हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या गेल्या.

Bharat Jadhav

प्रमुख निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणुकीची घोषणा केली. हरियाणामध्ये एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणामध्ये एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर चार ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

हरियाणामधे 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये 73 सर्वसाधारण जागा आणि 17 एससी जागा आहेत. त्याची मतदार यादी 27 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. यावेळी 2 कोटींपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. हरियाणात 20629 मतदान केंद्र असतील. प्रत्येक मतदार केंद्रावर सगळ्या सुविधा आयोगाकडून पोहोचवल्या जातील. 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच मतदान घरी जाऊन घेतल जाईल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

निवडणुकीच्या तारखा काय आहेत ?

5 सप्टेंबर रोजी निवडणुकीबाबत अधिसूचना निघेल.

१२ सप्टेंबर - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

१३ सप्टेंबर - अर्जाची छाननी करण्याची अखेरची तारीख

१६ सप्टेंबर - अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख

१ नोव्हेंबर - मतदान

४ नोव्हेंबर - मतमोजणी

हरियाणात सत्ता स्थापनेसाठी काय समीकरण -

हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ४६ इतका आहे. २०१९ मध्ये विधानसबा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहिले होते. भाजपला ४० जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला होता. जननायक जनता पार्टीला 10 आणि इनेलोने 1 जागेवर विजय मिळवला होता. एक जागा हरियाणा लोकहीत पार्टीने जिंकली होती. उर्वरित जागांवर अपक्षांनी विजय मिळवा होता. याआधी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ४७ जागांवर विजय मिळला होता.

महाराष्ट्रातील निवडणुका कधी ?

पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत निवडणूक आय़ुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की," महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुका यापूर्वी एकत्र झाल्या होत्या. यापूर्वी 3 निवडणुका एकत्र होत होत्या यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही 2-2 राज्यांच्या निवडणुकासोबत घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळं अनेक गोष्टी बाकी आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सण-उत्सव आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करूयात. "सुरक्षा पुरवण्याचा कारणावरून महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुका सोबत घेतल्या नाहीत, असेही निवडणूक आयुक्त म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT