Farmer News : देशातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारने विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे.
कापसाच्या दरात ५४० ते ६४० रुपयांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोयाबिनच्या दरात ३०० रुपयांच्या वाढीची शिफारस आहे. तर भुईमुगाच्या दराय ५२७ रुपयांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
कापूस मध्यम धागा- जुने दर - 6080, नवे दर - 6620, वाढ- 540
कापूस लांब धागा- जुने दर - 6380, नवे दर- 7020, वाढ 640
सोयाबीन- जुने दर- 4300, नवे दर - 4600, वाढ 300
तूर- जुने दर - 6600, नवे दर- 7000, वाढ 400
मका- जुने दर - 1962, नवे दर - 2090, वाढ 128
मूग- जुने दर - 7755, नवे दर - 8558, वाढ 803
उडीद - जुने दर- 6600, नवे दर- 6950, वाढ 350
भुईमूग- जुने दर -5850, नवे दर- 6377, वाढ 527
ज्वारी हायब्रीड- जुने दर - 2970, नवे दर - 3180, वाढ 210
ज्वारी मालदांडी- जुने दर - 2990, नवे दर - 3225,वाढ 235
भात सामान्य ग्रेड- जुने दर - 2040, नवे दर - 2183, वाढ 143
भात ए ग्रेड -2060, नवे दर - 2203, वाढ 143
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.