Budget 2025 Saam TV
देश विदेश

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

What Gets Cheaper and What Becomes Costlier: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नेमकं काय स्वस्त झालं आणि काय महाग झाले? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • अर्थसंकल्प २०२६म ध्ये अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली

  • कपडे, शूज, औषधे, ईव्ही बॅटरी आणि सोलर उत्पादने स्वस्त झाली

  • दारू, भंगार आणि फ्युचर्स ट्रेडिंग महाग झाले

  • सर्वसामान्य नागरिकांना महागाईतून काही प्रमाणात दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा नववा आणि मोदी सरकारचा १५ वा अर्थसंकल्प होता. केंद्र सरकारच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पामध्ये काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार? याकडे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्र्यांनी अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी केल्याबाबत घोषणा केली त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. काय स्वस्त आणि काय महाग झालेते आपण पाहणार आहोत...

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा करताना सांगितले की, विशेषत: भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी केले जात आहे. काही वस्तूंचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, चामडे आणि कपड्यांची निर्यात देखील शुल्कमुक्त असेल. या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी केले जात आहे. संरक्षण क्षेत्रात मुलभूत सीमाशुल्क माफ केले जात आहे.

काय स्वस्त झाले?

कपडे, चामड्याच्या वस्तू, सिंथेटिक फुटवेअर, कर्करोग आणि मधुमेहासह गंभीर आजारांवरील १७ औषध, लिथियम आयन सेल, मोबाईल, मोबाईच्या बॅटरी, इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी, सोलर गॅस, सौरऊर्जेशी संबंधित उत्पादने, बायोगॅस मिश्रित सीएनजी, ईवी, मायक्रोवेव्ह ओव्हन, विमानांचे इंधन, परदेश प्रवास, क्रीडा साहित्य, बीडी,

काय महाग झाले?

ज्या क्षेत्रामध्ये सीमाशुल्क वाढवले गेले त्या वस्तू महाग झाल्या आहेत. त्या वस्तूंमध्ये दारू, भंगार, खनिजे, फ्युचर्स ऑप्शन ट्रेडिंग, सिगरेट, तंबाखू, पान मसाला, विदेशी परफ्यूम, लक्झरी घड्याळ आणि आयात केलेल्या वस्तू यांचा समावेश होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाडव्याआधी सोनं झालं स्वस्त, तोळ्यामागे इतक्या रूपयांनी घसरलं, वाचा 22k, 24k गोल्डचे दर

मुंबई लोकलमध्ये महिलेचा अश्लील डान्स, पुरुषाला ही मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Mumbai-Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुर्घटना; बोगद्याचं छत कोसळलं

Maharashtra Live News Update : नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ

Mrunal Thakur : मृणाल ठाकूरनं घेतलं दगडूशेठ हलवाईचं दर्शन; फोटो शेअर करत म्हणाली, "पुण्यात आलो..."

SCROLL FOR NEXT