uma bharti news Saam TV
देश विदेश

उमा भारती यांनी दारूच्या दुकानात जाऊन फोडल्या बाटल्या; पहा व्हिडीओ

दारूच्या दुकांनबाबाद उमा भारतींचा संताप

वृत्तसंस्था

भोपाळ - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी रविवारी भोपाळमधील एका दारूच्या दुकानात घुसून दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या. याभागात दारूच्या दुकानबाबद उमा भरती प्रचंड संतापल्या. त्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्यक्षात दारूबंदीबाबत उमा भारतींनी दारू दुकानांबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

या वर्षी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेश सरकारने दारू स्वस्त केली होती. तर सत्ताधारी पक्ष भाजपच्या (BJP) नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की, 15 जानेवारी 2022 पर्यंत दारू बंदी होईल. मात्र तारीख संपायच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी दारूबंदी तर दूरच, शिवराज मंत्रिमंडळाने नवीन दारू धोरण जाहीर केले.

नवीन दारू धोरणांतर्गत विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क 10 वरून 13 टक्के करण्यात आले आहे. इंग्रजी आणि देशी दारू एकाच दुकानात उपलब्ध असेल. द्राक्षांव्यतिरिक्त, बेरीपासून वाइन देखील बनवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लोक पूर्वीपेक्षा चारपट जास्त दारू घरात ठेवू शकतील. ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे, ते आता घरीही बार उघडू शकेल. सध्या राज्यात 2544 देशी दारू आणि 1061 विदेशी दारूची दुकाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT