नवी दिल्ली : ब्रिटनचा पंतप्रधान कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. यूकेमध्ये ६५० जागांसासाठी मतदान पार पडलं आहे. गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या मतदान प्रक्रियेनंतर आता शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत ऋषि सुनक यांचं सरकार पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. तर मजूर पक्षाचे कीर स्टार्मर यांनी आघाडी घेतली आहे.
मतमोजणी सुरु असतानाच ब्रिटनमध्ये ऋषि सुनक यांना पुन्हा सत्ता मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत मजूर पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. कीर स्टार्मर यांची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरु आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्ष फक्त १३ जागांवर आघाडीवर आहे. तर मजूर पक्षाने १११ जागांवर विजय मिळवला असल्याचं सांगण्यात येत आहे. यूकेमधील सार्वत्रिक निवडणुकीत ३२६ हा मॅजिक फिगर गाठणारा पक्ष सत्तास्थानावर विराजमान होणार आहे.
६५० जागांसाठी झाली सार्वत्रिक निवडणूक
यूकेमध्ये ६५० जागांसाठी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत मतदान झालं. या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एक्झिट पोलमध्ये १४ वर्षांनी मजूर पक्ष पुन्हा सत्तेवर विराजमान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ऋषि सुनाक यांच्या पक्षाला ६५० पैकी १३१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मजूर पक्ष ४१० जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे.
मतमोजणी सुरु झाल्यावर ऋषि सुनक यांच्या पक्षाला पहिलाच मोठा झटका बसला. यूकेमधील पहिल्याच जागावर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला झटका बसला. या जागेवर कायदे मंत्री रॉबर्ट बकलँड यांना मजूर पक्षाच्या हेदी अलेक्झेंडर यांनी पराभव केला.
२०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत रॉबर्ट बकलँडच्या मतदानात २५ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. तर मजूर पक्षाचे हेदी यांनी पुन्हा पुनरागमन केलं आहे. दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाला ३६५ जागा मिळाल्या होत्या. तर मजूर पक्षाला २०२ जागा मिळाल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.