मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना दोन- तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेप्रकरणी वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. अत्याचारानंतर मदतीसाठी दारोदार फिरणाऱ्या पीडितेला कोणी मदत करत नव्हतं. ज्या घरांमध्ये ती मदत मागत तेथून तिला पळवून लावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत असताना सुद्धा नागरिकांच्या काळजाला पाझर फुटलं नाही. पीडितेला मदत न करता लोकं तिला पळवून लावत असल्याचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटजमध्ये दिसत आहे. (Latest News)
लोकांनी मदत केली नसल्याचं आरोप केला जात आहे. त्यावर उज्जैनचे पोलीस प्रमुख सचिन शर्मा म्हणाले की, रहिवाशांनी १५ वर्षाच्या मुलीला पैशांनी मदत केली. तिला कोणी ५० रुपये तर कोणी १०० रुपयांची मदत दिली, अशी एकूण १२० रुपयांची मदत दिल्याचं सांगितलं. पीडिता ज्या वस्त्यांमधून गेली होती तिथल्या लोकांनी तिला मदत केली. काहींनी तिला ५० रुपये दिले, तर काहींनी १०० रुपये दिले. तिने वाटेत एक टोल बूथ पार केला. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला पैसे आणि काही कपडे दिले. किमान ७-८ लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचं अधिकाऱ्याने सांगितले
दरम्यान, हल्ल्यानंतर अर्धनग्न अवस्थेत असलेल्या तरुणीला एक माणूस हाकलून देत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर शेवटी तिला एका आश्रमात मदत मिळाली. जिथे एका पुजाऱ्याने तिला कपडे दिले आणि पोलिसांना बोलावले. त्यानंतर २० मिनिटांनी पोलीस तेथे आले आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले. पीडितेचा व्हिडिओ ज्या भागातील आहेत, त्या भागातील लोकांच्या पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तेथील लोकांनी सांगितले त्यांनी तिला १२० रुपयांची आर्थिक मदत केली. पोलिसांना पीडिता ज्या ठिकाणी सापडली त्यावेळी तिच्याकडे १२० रुपये होते असं पोलिसांनी सांगितले.
दरम्यान पीडितेला आर्थिक मदतीपेक्षा उपचाराची गरज होती पण ती मिळाली नाही, अशी विचारणा पोलिसांना करण्यात आली तेव्हा पोलिसांनी सांगितले की, तेथील लोकांनी त्यांना शक्य होईल तितकी मदत दिली. मुलगी तेथील नागरिकांकडे मदत मागत नव्हती परंतु तिच्या पाठीमागे कोणीतरी लागलं आहे. माझ्या जिवाला धोका आहे, असं ती वारंवार सांगत असल्याचं पोलीस अधिकारी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.