Oldest Mother Of Africa Saam TV
देश विदेश

Oldest Mother Of Africa: वयाच्या ७० व्या वर्षी महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला; बाळांसह आईची सर्वत्र चर्चा

Ruchika Jadhav

Uganda 70 Years Old Mother:

प्रत्येक महिला ही मुलगी, बहिण, पत्नी यांसह एक आई देखील असते. आई होण्याचं स्वप्न सर्वच स्त्रिया पाहतात. मात्र बऱ्याच महिलांना आपलं हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. असंच स्वप्न अफ्रिकेतील (Africa) युगांडामध्ये राहणाऱ्या सफिना नामुकवेया या महिलेने देखील पाहिलं आणि वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वयाच्या ७० व्या वर्षी या महिलेला जुळं झालंय. सफिना नामुकवेया यांनी IVF तंत्राच्या मदतीने आई होऊ शकल्यात. सफिना यांचा आतापर्यंतचा प्रवास फार संघर्षाचा राहिला आहे. सफिना यांचे पहिले पती या जगात नाहीत. त्यांचे लग्न झाल्यावर १९९२ साली पतीचा मृत्यू झाला. फार कमी वयात पतीने साथ सोडल्याने त्या बरेच वर्ष एकट्याच राहिल्या.

एकटेपणा त्यांच्याबरोबर होता. पतीचे लवकर निधन झाल्याने त्यांना बाळही नव्हतं. त्याची परिस्थिती पाहून परिसरातील आणि नात्यातील व्यक्ती सतत त्यांना टोमणे मारायच्या. आपण आयुष्यात कधीच आई होऊ शकणार नाही असं त्यांनी आपल्या मनाशी पक्क केलं होतं. मात्र त्यांच्या प्रियकराने त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.

एकटेपणा दूर व्हावा म्हणून सफिना यांनी एका व्यक्तीशी मैत्री केली. पुढे सफिना यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यांनी आपल्या प्रियकराला आपल्या आयुष्यातील अडचणी सांगितल्या. तसेच मला आई (Mother) व्हायचंय अशी इच्छा व्यक्त केली. सफिना यांनी आई व्हावं यासाठी त्यांच्या प्रियकराने त्यांना IVF बाबत माहिती दिली.

सफिना यांचं वय वाढलं होतं. त्यांनी ७० री गाठल्यावर मुलांना संभाळणार कसं असा प्रश्न त्यांच्या मनात आला. त्या घाबरल्या आणि त्यांनी बाळाला जन्म देण्यास नकार दिला. मात्र प्रियकराने त्यांची समजूत घातली आणि IVF मार्फत मुलांना जन्म देण्यास सांगितले. सफिना यांनी आता दोन जुळ्या मुलांना जन्म दिलाय. मात्र त्यांचा प्रियकर त्यांच्यासोबत नाहीये. बाळांचा जन्म झाल्यापासून तो एकदाही त्यांना भेटायला आलेला नाही. आता दोन्ही मुलांचा संभाळ कसा करायचा असा मोठा प्रश्न सफिना यांच्यासमोर उभा राहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT