Political News Saam tv
देश विदेश

Thackeray Group on Nirmala Sitharaman: अर्थमंत्री टोमॅटो खातात का? महागाईचा भडका उडाला, ठाकरेंची शिवसेनाही भडकली; थेट सीतारामन यांच्यावर हल्लाबोल

वाढत्या महागाईवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य लोकांना हाल सोसावे लागत आहे. बाजारात टोमॅटोचे भाव देखील १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. या वाढत्या महागाईवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या २०१९ सालच्या लोकसभेतील एका विधानावरून निशाणा साधला आहे. प्रियंका चतुर्वेदी ट्विट करत म्हणाल्या की, 'अर्थ मंत्री सीतारामन टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या दरावर त्या उत्तर देऊ शकतात का?',असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

२०१९ साली सीतारामन या कांद्याच्या वाढत्या दराबाबत म्हटल्या होत्या की, 'मी लसूण, कांदा खात नाही. मी अशा कुटुंबातून येते, जिथे कांद्यांची पर्वा नसते'. यावरून विरोधकांनी रान उठवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टोमॅटोचे भाव वाढले आहेत. घाऊक मंडईत टोमॅटोचे भाव ६० रुपये ते ८० रुपयांपर्यंत वाढले आहे. बाजारात टोमॅटोचा पुरवठा होत नसल्याने टॉमॅटोचे भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. या वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना झळा सहन कराव्या लागत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टोमॅटोची कमी पेरणी झाली. तर गेल्या वर्षी अनेक शेतकरी सोयाबीनच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोयाबीनच्या शेतीकडे वळले होते, अशी माहिती केडिया अॅडव्हायझरीचे प्रमुख अजय केडिया यांनी दिली.

'त्याचबरोबर गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका पिकांना बसला. तसेच अतिवृष्टी आणि अति उष्णतेचा फटका टोमॅटोच्या पुरवठ्या झाला. त्यामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा मर्यादित प्रमाणा झाला, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT