Rajsthan Gujrat News Saam Tv
देश विदेश

Shocking : प्रेमाचा भयंकर शेवट! जंगलात सापडला तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, हत्या की आत्महत्या?

Rajsthan Gujrat News : राजस्थान-गुजरात सीमेवरील बांसवाडा जिल्ह्यातील जंगलात प्रेमी युगुलाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सापडले असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

राजस्थान-गुजरात सीमेवरील जंगलात प्रेमी युगुलाचे कुजलेले मृतदेह सापडले

मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आणि झाडाला फास घेतलेले होते

पोलिसांना मृत तरुणाच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने ओळख पटली

प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त

राजस्थानमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका प्रेमी युगलांचा मृतदेह राजस्थान-गुजरात सीमेवरील एका जंगलात सापडला. धक्कदायक म्हणजे हे मृतदेह बऱ्याचदिवसापासून जंगलात पडल्याने ते कुजलेल्या अवस्थेत पोलिसांच्या हाती लागले. प्राथमिक तपासात या दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. यातील तरुणाची ओळख पटली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान-गुजरात सीमेवरील बांसवाडा जिल्ह्यातील आनंदपुरी पोलीस स्टेशन परिसरातील ग्रामपंचायत वरेठच्या घनदाट जंगलात बुधवारी एका तरुण प्रेमी युगुलांचा मृतदेह सापडला. या दोघांचा मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थते सापडला. तरुणीचा मृतदेह अर्ध नग्न अवस्थेत होता. तिचं डोकं शरीरापासून वेगळं होऊन जमिनीवर पडलेलं होत. तसेच तिच्या डोक्यात फास लावलेला दोर आढळला.

या तरुणीच्या प्रियकराचा मृतदेह झाडाला फास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गावातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना मृत तरुणाच्या खिशात आधार कार्ड सापडलं. या आधार कार्डच्या आधारे या तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या प्रेमी युगुलांनी प्रेम प्रकरणातूनच आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नेमकी ही आत्महत्या आहे की हत्या याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...; सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Kothimbir Dishes : कोथिंबीरपासून तयार होणाऱ्या ५ अप्रतिम आणि झटपट बनणाऱ्या डिशेस

Suraj Chavan: सूरज चव्हाणने बंगला बांधलाय ते ठिकाण कुठे आहे?

Gold Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

SCROLL FOR NEXT