pistol Saam Tv
देश विदेश

अल्पवयीन मुलं युट्युबवरुन शस्त्रे बनवायला शिकली; केला व्यापार सुरु पलिसांनी घेतलं ताब्यात

साम वृत्तसंथा

जबलपुरच्या धन्वंतरी नगर पोलिसांनी (Police) दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. या दोन अल्पवयीन आरोपींजवळ गावठी कट्टा व चाकू जप्त केला आहे. पोलिसांनी या दोन मुलांची चौकशी केली. या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

या मुलांनी शस्त्रे युट्युबवरुन (Youtube) बनवायला शिकले. यानंतर त्याच शस्त्रांचा व्यापार सुरु केला. अशी माहिती त्या मुलांनी पोलिसांना दिली. त्या मुलांनी विकलेल्या शस्त्रांचा पोलिस शोध घेत आहेत.

घरातचं तयार करत होते शस्त्रे

दोन्ही अल्पवयीन मुलं जबलपुरच्या हनुमंतल येथे राहणारी आहेत. अटक करण्यात आलेल्या एका मुलाचे वडील इलेक्ट्रेशियनचे काम करतात. त्याच्या घरी इलेक्ट्रीकचे सामान पडून होते. दोन्ही मुलांनी या सामानाने युट्युब (Youtube) वरुन शस्त्रे बनवायला शिकले. हनुमंतल येथील सय्यद बाबा मझारजवळ राहणारी दोन्ही मुलांवर यापूर्वीही अशाच बेकायदेशीर कृत्यांसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल होतं.

दोन्ही अल्पवयीन मुलांकडून माहिती मिळाल्यानंतर धन्वंतरीनगर चौकीच्या पोलिसांनी (Police) त्या मुलांनी सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकला. छापेमारीत पोलिसांना शस्त्रांनी भरलेली खोली सापडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन पिस्तूल, 8 तलवारी, 5 ड्रिल मशीन, वेल्डिंग मशिन, ग्राइंडर कटर आणि शस्त्रे बनवण्यासाठी वापरलेली अनेक साधने जप्त केली आहेत. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही अल्पवयीन मुलं पिस्तूल मधील गोळ्या बनवण्याच्या तयारीत होते. आरोपी बेकायदेशीर शस्त्रे बनवण्यात माहीर आहेत, सध्या ते कट्टे, चाकू आणि तलवारी बनवत होते, पण नंतर ते गोळ्या बनवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी (Police)दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे अशी माहिती धन्वंतरी नगर चौकीचे प्रभारी सतीश झरिया यांनी दिली.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉन्सला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

SCROLL FOR NEXT