Rajasthan Sikar Car Accident News Saam TV
देश विदेश

Accident News: अतिवेग जीवावर बेतला, दोन कार समोरासमोर धडकल्या; ६ जण जागेवरच गेले, भयानक घटना!

Sikar Car Accident: भरधाव वेगात असलेल्या दोन कारची समोरासमोर धडक (Accident News) झाली. या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले.

Satish Daud

Rajasthan Sikar Car Accident News

महामार्गावरून वाहने चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, असं आवाहन वारंवार वाहतूक पोलिसांकडून केलं जातं. मात्र, तरीही वाहनचालक अगदी बेफानपणे सुसाट गाड्या चालवतात. परिणामी मोठमोठ अपघात होऊन अनेकांचा जीव जातो, अशीच एक घटना राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लक्ष्मणगढ पोलीस स्टेशन परिसरात रविवारी (१४ जानेवारी) भरधाव वेगात असलेल्या दोन कारची समोरासमोर धडक (Accident News) झाली. या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार जयपूर-बिकानेर राष्ट्रीय महामार्गावर सीकरहून लक्ष्मणगढच्या दिशेने जात होती. कारचा वेग असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात कार दुभाजकाला धडकून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या कारला धडकली. (Latest Marathi News)

या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघात इतका भीषण होता, की पोलिसांना मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून दोन्ही वाहनांचे चेसेस क्रमांक मिळवण्याचे काम सुरू होते. घटनेबाबत सीकरचे पोलीस उपनिरीक्षक मोहन सिंग यांनी सांगितले की, अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून कटरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढावे लागले. अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नसून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT