delhi Accident  Saam
देश विदेश

आयपीएल पाहून घरी जाताना काळाचा घाला, २ भावांचा जागीच मृत्यू, नेमकं झालं काय?

hit and run case after cricket match latest news : दिल्लीत आयपीएल सामना पाहून घरी जात असताना दोन भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. a

Namdeo Kumbhar

two brothers killed after IPL match Delhi accident details : दिल्ली आणि आरसीबी या दोन संघामध्ये झालेला आयपीएलचा सामना पाहण्यासाठी राजधानी दिल्लीतील मैदानात मोठी गर्दी झाली होती. आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी शेकडो लोक मैदानावर गेले होते. पण या सामन्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली आहे. आयपीएल सामना पाहून घरी जाताना २ भावांवर काळाने घातला. भरधाव वेगात असणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

स्टेडियममध्ये असतानाच मुलाच्या वडिलांचा फोन आला होता. अर्ध्या तासात घरी पोहचतो, असे बापाला त्याने सांगितले होते. पण नियतीला काही वेगळेच करायचे होते. घरी आई-बाप मुलाची वाट पाहत राहिले अन् त्या मुलावर काळाने घाला घातला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर त्या भरधाव वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सीटीटीव्हीच्या आधारावर पोलिसांकडून त्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.

राजधानी दिल्लीमधील अशोक रोडवरील पीएनबी कॉम्प्लेक्ससमोर महादेव रोड टी-पॉईंटजवळ तरूणांच्या दुचाकीला एका मालवाहू वाहनाने धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही तरुण रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यज्ञ भाटिया आणि अभव भाटिया अशी मृतांची नावे आहेत. यज्ञ २० वर्षाचा आहे, तर अभव १४ वर्षांचा आहे. ते दिल्ली आणि आरसीबी यांच्यातील सामना पाहण्यासाठी दुचाकीवरून मैदानावर गेले होते. यज्ञ हा बीएससीचा विद्यार्थी होता, तर अभव शाळेत ८ वीच्या वर्गात शिकत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या ठिकाणाहून पळून गेलेल्या मालवाहू वाहनाची ओळख पटली असून चालकाचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

Fuel Price Hike : देशात विमान सेवा बंद होणार? एअरलाईन्स अडचणीत, एअर इंडियाचे थेट सरकारला पत्र; जाणून घ्या कारण

Abhishek Bachchan : अभिषेकने खोटी अंगठी घालून केलं होत ऐश्वर्या रायला प्रपोज, बच्चन कुटुंबाच्या लेकावर 'अशी' वेळ का आली?

IPL मध्ये नवा वाद! राजस्थानचा कर्णधार सामना सुरू असताना ओढतोय सिगारेट; व्हिडिओने खळबळ

SCROLL FOR NEXT