'सत्यमेव जयते' : अकाऊंट अनलॉक झाल्यानंतर कॉंग्रेसचे पहिले ट्विट  Saam tv news
देश विदेश

'सत्यमेव जयते' : अकाऊंट अनलॉक झाल्यानंतर कॉंग्रेसचे पहिले ट्विट

हा भारताची लोकशाही आणि नागरिकांच्या विचार स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''मोदी सरकारच्या इशाऱ्यावर @Twitter ने @RahulGandhi जीं सह आमचे हँडल लॉक केले होते. हा भारताची लोकशाही आणि नागरिकांच्या विचार स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. लोकशाही, संविधान आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही यापुढे अधिक आक्रमकपणे आवाज उठवू! '' अशा शब्दात राज्यातील कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राहूल गांधीचे अकाउंट अनलॉक झाल्यावर पहिले ट्विट केले आहे. (Twitter unlocks account of Congress leaders)

हे देखील पहा -

तर कॉंग्रेसनेही राहूल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अनलॉक झाल्यानंतर 'सत्यमेव जयते' असे लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, मनिकम टागोर, आसामचे प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आदींचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा ट्विटरने त्यांचे अकाऊंट अनलॉक केले. त्यानंतर कॉंग्रेसने पुन्हा केंद्रसरकारवर निशाणा साधाला आहे.

ट्विटरने (Twitter) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे खाते अनलॉक केले होते. राहुल गांधींनी दिल्लीतील नऊ वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर ट्विटरने तात्पुरते निलंबित केले होते. त्यानंतर ते लॉक करण्यात आले. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांच्या भेटीचा फोटो ट्वीट केला होता. ज्याला भाजपने आक्षेप घेतला. तर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत राहूल गांधीवर कारवाई कऱण्याची मागणी केली होती.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Grahan 2025: पितृ पक्षात लागणार यावर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण; न्यायाधीश शनी बनवणार शक्तीशाली योग

Maharashtra Weather Update: मुंबईत पावसाचा जोर ओसरला, राज्यात अतिमुसळधार, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा हवामानाचा अंदाज

Horoscope: वाहन खरेदी अन् आर्थिक लाभाचा योग; बुधवार ठरेल भाग्य चमकवणारा दिवस, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

SCROLL FOR NEXT