नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) पुन्हा एकदा आपल्या संकेतस्थळावर भारताचा (India) चुकीचा नकाशा दर्शविला आहे. यावेळी ट्वीटरने जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) आणि लडाख (Ladakh) भारताचा भाग नसल्याचे दर्शविले आहे. ट्विटर वेबसाइटच्या करिअर विभागात 'ट्वीप लाइफ' (Twit Life) या शीर्षकाखाली हा नकाशा दिसेल. आधीच नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांमुळे वादात अडकलेले ट्विटर यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ट्विटरच्या संकेतस्थळावरील भारताच्या नकाशावर छेडछाड केली आहे. ट्विटरने आपल्या वेबसाइटवर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र प्रदेश म्हणून दाखवले आहे. भारत सरकारनेही या प्रकरणाची दखल असून आता केंद्र सरकारचे संबंधित अधिकारि या प्रकरांची चौकशी करत आहेत. या नाकाशत बदल कधी करण्यात आले, तो वेबसाइटवर कधी टाकण्यात आला, जम्मू काश्मीर आली लडाख भारतापासून वेगळे दाखविण्यामागे हेतु काय होता, कोणत्या लोकानी ट्विटरल हा नकाशा दिला, कोणत्या लोकांनी ट्विटवर हा नकाशा अप लोड करायला सांगितला, याबाबत सरकारी अधिकारी तपास करत आहेत.
ट्विटरच्या करिअर पृष्ठावरील ट्वीप लाइफ विभागात जगाचा नकाशा आहे. येथून कंपनी ट्विटर टीम जगात कोठे कोठे काम करते हे या नाकाशत दाखविण्यात आले आहे. या नकाशामध्ये भारत देखील आहे, परंतु भारताचा नकाशा विवादित म्हणून दर्शविला गेला आहे. यापूर्वीदेखील लडाखचा भाग भारताचा भाग म्हणून दाखविला गेला नव्हता, काही काळानंतर यात बदल करण्यात आले.
आता भारत सरकानेही ट्विटरला उघडउघड विरोध करायला सुरुवाट केली आहे. ट्विटरने भारताबद्दल दुटप्पी भूमिका घेतल्यास ट्विटरला याचे ट्विटरला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं इशारा केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद ट्विटरला दिला आहे. दरम्यान आता ट्विटरने जम्मू काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे दाखविल्यामुळे नेटकाऱ्यांनीही ट्विटरला धारेवर धरत टीका करायला सुरवात केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.