हृदयद्रावक! गाझियाबादमध्ये 25 व्या मजल्यावरून पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी अंत Saam Tv
देश विदेश

हृदयद्रावक! गाझियाबादमध्ये 25 व्या मजल्यावरून पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी अंत

रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका उंच इमारतीमधील २५ व्या मजल्यावरून खाली पडून जुळ्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका उंच इमारतीमधील २५ व्या मजल्यावरून खाली पडून जुळ्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी जन्म आणि दुर्दैवी पद्धतीने एकाच दिवशी मृत्यू आल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. २५ व्या मजल्यावरून ते दोघं नेमके कसे खाली पडले, याचे गूढ आजून उलगडले नसून पोलिसांनी चहुबाजूंनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी मृत मुलाच्या आईची चौकशी केली असून अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

हे देखील पहा-

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशात मधील गाझीयाबाद येथील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सिद्धार्थ विहार सोसायटीत घडली आहे. तर सूर्य नारायण आणि सत्य नारायण असे संबंधित दोघा मृत भावांची नावे आहे. १४ वर्षीय मृत भावंडे मध्यरात्री फ्लॅटच्या गॅलरीत खेळत होते. खेळत असताना दोन्ही भाऊ अचानकच खाली पडले आहेत. या घटनेच्या वेळी मृत मुलांची आई आणि बहीण घरातच होते. तर वडील हे कामानिमित्त मुंबईला गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घरामधील सर्वजण झोपायला गेले होते. दरम्यान १४ वर्षीय सत्य नारायण आणि सूर्य नारायण फ्लॅटच्या गॅलरीत खेळत होते. दरम्यान अचानक रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोघे भाऊ इमारतीच्या २५ व्या मजल्यावर बाल्कनीतून खाली पडले आहेत. अचानक एवढ्या उंचावरून कोसळल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे.

ही घटना उघडकीस येताच सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले आहेत. तसेच रात्री घरात सर्वजण झोपायला गेल्यानंतर, नेमकं काय घडलं. दोघंही रोलिंग ओलांडून पलिकडे कसे गेले? हा अपघात आहे की घातपात अशा सर्व प्रश्नांबाबत गूढ निर्माण झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

SCROLL FOR NEXT