Turkey News: Over 5,000 people killed in earthquakes AFP News Agency
देश विदेश

Turkey Earthquake Update: तुर्कस्तानात तीन दिवसात 435 छोट्या-मोठ्या भूकंपांची नोंद, मृतांचा आकडा 7800च्या वर

भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Turkey, Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे.मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत 7800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तुर्की आणि सीरियामधील रुग्णालये जखमींनी भरून गेली आहेत. अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे.

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या 7.7 तीव्रतेच्या  भूकंपानंतर आतापर्यंत एकूण 435 भूकंपांची नोंद झाली आहे. ते म्हणाले की, भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपानंतर जगभरातील देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जवळपास 70 देशांच्या टीम मदत आणि बचाव कार्यासाठी तुर्कस्तानमध्ये पोहोचली आहे. पण तुर्कस्तानचे खराब हवामान मदत आणि बचावासाठी अडथळा ठरत आहे.

भारताकडून मदतीचा हात

तुर्कस्तानमधील भूकंपानंतर भारतानेही तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने मदत साहित्य, उपकरणे आणि लष्करी जवानांची चार सी-17 विमाने पाठवली आहेत. यासोबतच 108 टनांपेक्षा जास्त वजनाची मदत पॅकेज तुर्कीला पाठवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

SCROLL FOR NEXT