Turkey News: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या सलग भूकंपानंतर बचाव पथकांनी मंगळवारी थंड हवामानाविरूद्ध लढा देत आपले रेस्क्यू ऑपरेशन सुरु ठेवले. एकामागोमाग आलेल्या या भूकंपात आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तसेच या भूकंपामुळे अनेक इमारती भुईसपाट झाल्या. या इमारतीं खाली दबलेल्यांचा बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.
आपत्ती एजन्सींनी सांगितले की विस्तीर्ण सीमावर्ती प्रदेशातील शहरांमध्ये हजारो इमारती सपाट झाल्या आहेत. युद्ध, बंडखोरी, निर्वासितांची संकटे आणि अलीकडील कॉलराचा उद्रेक यामुळे आधीच त्रस्त असलेल्या या भागावर या प्रचंड शक्तिशाली भूकंपामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)
सलग ५ भूकंपांनी तुर्कस्तान आणि सिरीया हादरले आहे. तुर्कस्तानमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रतारिश्टर स्केलवर ५.९ इतकी मोजली गेली. याआधी सोमवारी तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीन जोरदार धक्के जाणवले. यापैकी पहिला भूकंप पहाटे ४ वाजता ७.८ रिश्टर स्केलचा होता. यानंतर ७.५ आणि ६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
भूकंपामुळे येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तुर्कस्तानमध्ये अवघ्या काही तासांत भूकंपाचे पाच मोठे धक्के बसल्याने मोठा हाहाकार उडाला. या भूकंपात आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकाचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.