Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेच्या ठिकाणी गोंधळ, जमावाने दगडफेक केल्याची घटना

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेच्या सभेच्या परिसरात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeraysaam tv

>>निवृत्ती बाबर

Aaditya Thackeray: शिवसेनेचे आमदार आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसंवाद यात्रा साधत आहेत. आदित्य ठाकरेंची संवाद यात्रा आज नाशिकमध्ये आहे. महालगावात आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेच्या सभेच्या परिसरात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी जमावाने किरकोळ दगडफेक केल्याची घटना घडली.

आदित्य ठाकरे यांचा संवाद यात्रेचा कार्यक्रम आणि या परिसरात निघालेली रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं जमावाने किरकोळ दगडफेक केली. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या यात्रेच्या ठिकाणाबाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला.

Aaditya Thackeray
Jayashree Thorat : 'साहेबांनाही माझी काळजी वाटायला लागली'; बाळासाहेब थोरात यांच्या कन्या असं का म्हणाल्या?

या घटनेमुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपलं भाषण आटपत घेतले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी स्टेजच्या खाली उतरून भाषण केले आणि जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. शिवशक्ती आणि भिमशक्तीची एकजूट दाखवून द्या असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी जमावाला शांत करण्याची केले.

Aaditya Thackeray
Shinde Government : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जाचं टेन्शन दूर होणार, शिंदे सरकारकडून मोठी घोषणा

'गद्दारांच सरकार दोन ते तीन महिन्यात पडणार'

गद्दारांच सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात पडणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टिका केली आहे. नाशिकच्या नांदगाव येथे बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे राज्यात संवाद यात्रा घेत आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, याआधी जेव्हा जेव्हा लोकांनी पक्ष बदलले, तेव्हा तेव्हा ते राजीनामा देऊन लढले आणि जिंकून आले आहेत. पण हे लढायला तयार नाहीत. मला एकजण म्हणाला की तुमचं डिपॉजिट जप्त होईल. मी तयार आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना ठाण्याची आहे आणि ठाणे शिवसेनेच आहे असे देखील ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com