Jayashree Thorat : 'साहेबांनाही माझी काळजी वाटायला लागली'; बाळासाहेब थोरात यांच्या कन्या असं का म्हणाल्या?

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयश्री थोरात बोलत होत्या
Jayashree Thorat
Jayashree Thorat saam tv
Published On

सचिन बनसोडे

Jayashree thorat News : 'मी गेल्या काही महिन्यांत अनेक सप्ताहांमध्ये भाषणं केली. आता साहेबांनाही (वडील बाळासाहेब थोरात ) काळजी वाटायला लागली की, माझी पोरगी प्रवचनकार होते की काय? असं जयश्री थोरात म्हणाल्या. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयश्री थोरात बोलत होत्या. (Latest Marathi News)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वेल्हाळे येथे हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने किर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला होता. तानाजी शिरतार व त्यांच्या मित्र मंडळाने गेले सात दिवस या सप्ताहात नावाजलेले नामवंत किर्तनकारांच्या श्रवणीय किर्तनांचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात हजेरी लावली. या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे देखील उपस्थित होते. किर्तन संपल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Jayashree Thorat
Chandrashekhar Bawankule : 'थोरात मोठे नेते, त्यांना भाजपमध्ये योग्य सन्मान दिला जाईल', चंद्रशेखर बावनकुळेंची खुली ऑफर

'मी गेल्या काही महिन्यात अनेक सप्ताहांमध्ये भाषण केली. आता साहेबांना ( वडील बाळासाहेब थोरात ) काळजी वाटायला लागली की, माझी पोरगी प्रवचनकार होते की काय? असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पीकला. कॅन्सर तज्ञ असल्याने जयश्री थोरात यांनी महिलांना कॅन्सरपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं देखील आवाहन केल.

Jayashree Thorat
Shinde Government : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जाचं टेन्शन दूर होणार, शिंदे सरकारकडून मोठी घोषणा

दरम्याना, काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससमध्ये नाराजीनाट्य सुरू होते. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.आता वाढदिवसा दिनीच बाळासाहेब थोरातांनी मोठा धक्का दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर प्रसार माध्यमांसमोर भाष्य करताना जयश्री थोरात म्हणाल्या, 'साहेबांची माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही. साहेब जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं, मात्र यावर मी काही बोलू शकत नाही, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com