Turkey Bus Accident News Saam tV
देश विदेश

Accident News : धुक्याने घात केला! प्रवाशांनी भरलेल्या बसचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Turkey Bus Accident News : तुर्कीच्या अंतल्या प्रांतात ३४ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण गंभीर जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • तुर्कीतील अंतल्या प्रांतात प्रवासी बस दरीत कोसळली

  • ३४ प्रवाशांपैकी ९ जणांचा मृत्यू, २६ गंभीर जखमी

  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

  • स्थानिक प्रशासनाकडून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त

तुर्की येथे ३४ प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण गंभीर जखमी आहे. स्थानिक प्रशासनाने म्हटल्याप्रमाणे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान हा अपघात काल रात्रीच्या सुमारास घडला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की येथील दक्षिणेकडील अंतल्या या प्रांतात काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास धुकं आणि ओलसर रस्त्यांमुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला.

त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस बाजूला असलेल्या सरंक्षक भिंतीला तोडून थेट दरीत कोसळली. यावेळेस या बसमध्ये सुमारे ३४ प्रवासी प्रवास करत होते. हे सगळे प्रवासी पर्यटनासाठी फिरत होते. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अपघाताची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. यामध्ये बस चालकाला रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने वर्तवली आहे. दरम्यान याबाबात पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित ठाकरेंनी अनाथालयातील लहान मुलींसोबत साजरा केला वाढदिवस

Mumbai Metro Line 11: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सर्वात महत्त्वाच्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाला वेग; काम कुठंपर्यंत आलं?

Pune Rain: पुण्यात पावसाचा हाहाकार! रस्ते पाण्याखाली, वाहनं बुडाली; नजर फिरवेल तिकडे पाणीच पाणी; पाहा VIDEO

आणखी एका 'कॉकरोच पार्टी'ची स्थापना, सत्ताधाऱ्यांचे टेंशन वाढलं; राजकीय वर्तुळात खळबळ

Top 10 Actress: टॉप १० अभिनेत्रींची यादी जाहीर; भारताची नंबर १ अभिनेत्री कोण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT