पीटर नवारो यांनी भारताला “टॅरिफ राजा” म्हणत रशियन तेल खरेदीवरून टीका केली.
भारत स्वस्त तेल शुद्ध करून प्रीमियम दराने विकतो, असा आरोप नवारो यांनी केला.
अमेरिकी दबाव असूनही भारताने रशियन तेल खरेदी सुरूच ठेवली.
मोदींचे कौतुक केले असले तरी भारताच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रशियन युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात अमेरिका वारंवार अपयशी ठरत आहे. अशातच भारतावरील दबाव वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो यांनी भारताविरूद्ध पुन्हा एकदा गरळ ओकली. त्यांनी भारताला टॅरिफ राजा म्हटले असून, रशियन तेल आयात करून नफा कमावण्याची योजना राबवल्याचा ठपका ठेवला आहे.
नवारो यांनी थेट सांगितले की, भारताला रशियन तेलाची कोणतीही गरज नाही. भारताची तेलाची गरज पुर्णपणे मुर्खपणाची आहे. युक्रेन युद्धापूर्वी भारताची रशियन तेलाची आयात शून्य होती. मग आता एवढी आयात का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी भारत सरकारवर रिफायनरी उद्योग 'नफा कमावणारा व्यवसाय' बनवल्याचा आरोप केला आहे.
भारतावर मोठे टॅरिफ लावून दबाव आणण्याचा अमेरिकेचा डाव अलीकडेच उघड झाला. या शुल्कामुळे भारत घाबरून रशियापासून दूर जाईल, अशी अमेरिकेला वाटत होते. पण भारतानं या शुल्कापुढे झुकण्यास नकार दिला. भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. भारत सरकारच्या कृतीमुळे अमेरिका संतापली. नवारो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.
नवारो यांनी भारताला रशियासाठी क्रेमलिनची वॉशिंग मशीन असं म्हटलंय. नवी दिल्लीतून स्वस्तात रशियन तेल खरेदी करून ते शुद्ध करून प्रीमियम दरानं विकून भारत रशियाला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नवारो एवढ्यावरच न थांबता भारत चीनसोबत जवळीक साधत असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महान नेते म्हटलं आहे. शांततेचा मार्ग नवी दिल्लीतून जातो, असं ते म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सध्याचे धोरण युद्धाला प्रोत्साहन देणारे असल्याचं त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.