बिग सॅल्यूट जनरल बिपीन रावत !; पाहा हा विशेष रिपोर्ट ! Saam Tv
देश विदेश

CDS बिपीन रावत यांना लोकसभेत श्रद्धांजली; सैनिकी मानवंदनेत होणार अत्यसंस्कार...

सगळ्या पार्थिव शरीरांना आज संध्याकाळी एअर फोर्सच्या विमानाने दिल्लीला आणले जाईल अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: बुधवारी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांसह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) मृत्यू झाला होता. हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जण हे मृत्यूमुखी पडले तर एकजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेले जनरल बिपीन रावत (Chief of Defence Staff Bipin Rawat) यांसह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (madhulika Rawat) आणि अन्य सर्वांना लोकसभेत (Loksabha) आज श्रद्धांजली (Tribute) वाहिली गेली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत काही क्षण मौन बाळगत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. (Tribute to CDS Bipin Rawat in Lok Sabha; Funeral will be held in military salute)

हे देखील पहा -

त्यापुर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी लोकसभेत या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, भारताचे प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हे डिफेन्स सर्विसेस स्टाफच्या वेलिंगटनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमाला जात होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य बारा जण प्रवास करत होते. एअर फोर्सच्या (Indian Air Force) MI15V5 या हेलिकॉप्टरमधून त्यांनी ११:४८ वाजता सुलुर एअरबेस वरुन उड्डाण केले. त्यांना १२:१५ वाजता वेलिंगटनमध्ये लॅंड करायचे होते. १२:०८ वाजता हेलिकॉप्टरचा सुलुर एअरबेसशी संपर्क तुटला. नंतर सुलुरच्या जंगलात स्थानिकांनी आग बघितली आणि त्याठिकाणी धाव घेतली. तेव्हा त्यांनी हेलिकॉप्टरला आग लागलेली असल्याचं बघितलं. स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. त्यांनी जळत असलेल्या हेलिकॉप्टरमधून लोकांना बाहेर काढलं आणि वेलिंगटनच्या सैन्य रुग्णालयात नेण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत १४ पैकी १३ लोकांच्या मृत्यू झाला आहे. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनेंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पी. एस. चौहान, स्क्वॉड्रन लीडर के. सिंह, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए., हवलदार सतपाल, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक साइ तेजा अशी दुर्घटनेतील मृतांचा नावे आहेत.

सगळ्या पार्थिव शरीरांना आज संध्याकाळी एअर फोर्सच्या विमानाने दिल्लीला आणले जाईल. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वेलिंगटनमधील सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असून ते सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एफर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी घटनास्थळ आणि वेलिंगटन रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एअर फोर्सने एअर मार्शन मानेंद्र सिंह अध्यक्षतेखाली चौकशी सुरु केली आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यावर आणि अन्य सैनिकी अधिकाऱ्यांवर सैनिकी मानवंदनेत अंत्यसंस्कार केले जातील. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT