Pahalgam terror attack saam tv
देश विदेश

Pahalgam terror attack: काश्मिरमधील भ्याड हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली; कुठून होतं फंडिंग?

Pahalgam Terror Attack: मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २८ जणांना मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट असल्याची माहिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आतंकवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर पुन्हा एकदा हादरलं आहे. दहशतवाद्यांनी हल्ला करत पर्याटकांवर बेठूट गोळीबार केला. यामध्ये एकूण २८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या हल्ल्याची दबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लष्करची ही संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) २०१९ मध्ये अस्तित्वात आली. टीआरएफचा मास्टरमाइंड सज्जाद गुल असून हा पाकिस्तानमध्ये बसून ही संघटना चालवत असल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानमधून होतं संघटनेला फंडिंग

टीआरएफचे दहशतवादी हे जम्मू काश्मीमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. याची फंडिंग पाकिस्तानी सेना आणि ISI कडून होते. माहितीनुसार, या संघटनेचं नेतृत्व सज्जाद गुल, सलीम रहमानी आणि साजिद जाट यांच्याद्वारे केलं जातं. भारत सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत याला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घातलीये.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर तसंच नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांसह अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी टीआरएफने स्वीकारलीये. गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबलमधील झेडमोड बोगद्यात दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये ७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या हल्ल्यासाठी टीआरएफ जबाबदार असल्याचं मानलं जातंय.

किती धोकादायक आहे टीआरएफ संघटना?

२०२० मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर टीआरएफ प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. टीआरएफचे दहशतवादी टार्गेट किलिंग करतात. यामध्ये या संघटनेकडून बहुतेक गैर-काश्मिरी लोकांना मारलं जातं. त्यामुळे बाहेरील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होताना दिसतं.

पहलगाममध्ये २८ लोकांनी गमावला जीव

जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्यामध्ये २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये २० लोकं जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT